*पक्ष* *आणि* *पक्षी*
अॉक्टोंबर संपुन एव्हांना नोव्हेंबर चालु झाला होता.वातावरणातला ऊष्मा काही कमी होतांना दिसत नव्हता.दिवसभर तापत्या ऊन्हाच्या झळा सोसुन सगळेच वैतागले होते.प्राणी ,पक्षी तरी याला कसा अपवाद असणार!मावळत्या सुर्याची कलती किरणे घेऊन केशरी गोळा अस्तांचलास निघाला होता.पक्षीगणही घरट्यात परतण्यास येत होते.तेवढ्यात बांधकाम सुरु असलेल्या त्या अर्धवट इमारतीच्या गच्चीवर पाणी मारण्याचे काम चालु होते.पाणी सिमेंटच्या बांधकामाने अडवुन तळ्याचेच स्वरुप आले होते. झाडामाडातुन येणारा केशरी संधीप्रकाश चहुकडे पसरला होता.अशातच ते साठलेले पाणी पाहुन पक्षी आनंदले.एक एक पक्षी येऊन मनसोक्त डुबकी मारु लागला.आपल्या इवल्या चोचीने तहान भागवुन झाल्यावर,आपले इवले इवले पंख भिजवुन तेथेच सिमेंटच्या बांधावर बसत होता. सगळ्या पक्षांचे जणु स्नेहसंमेलन भरल्यासारखे वाटत होते.कावळे ,कबुतर हे मोठे पक्षी.तर चिमण्या,बुलबुल,नाचरा,सनबर्डस,मुनीया ,दयाळ अॅशी पिरीनीया अशा अनेक प्रकारचे लहान पक्षी मजेत पाण्यात बागडत होते.कितीतरी वेळ मी त्यांचे विभ्रम पहात गॅलरीत ओठंगुन ऊभी होते.
सांजसावल्या गडद झाल्या तशी मी माघारी फिरले.मनांत सहजच विचार आला,हे पक्षी जसे एकोप्याने ,एकदिलाने पाणवठ्यावर वावरतात तसे महाराष्ट्रातले 'पक्ष' एकदिलाने,एकजुटीने का नाही राहात?
सौ.पुर्वा लाटकर
Great article! For more information on job opportunities, check out Naukri Kendra.
ReplyDelete