ज्या हाताने जन्माला येती
हजारो जीव या अवनी वरती
त्याच हाताने शब्द फुले फुलती
काव्य गझल रचना अंकुरती
अनेकांना प्रोत्साहन देती
सकाळांशी प्रेमाने वागती
मदत करती सढळ हाती
नसे आपपरभाव मनी
विनम्र असे जयाची वाणी
गर्व नसे यत्किंचितही अंतःकरणी
व्यवसाय ,कुटुंब ,नातीगोती
मित्र परिवार आणि सुर्हुदांना जपती
वेळ लावती सत्कारणी
आपत्काळात धावून जाती झणी
रोजच्या धबडग्यातहि चालते लेखणी
एक कवी ,लेखक जपला आहे मनी
मिळो आपल्या कार्याला यश
हीच प्रार्थना ईश्वरचरणी
सौ.पूर्वा लाटकर
डॉ. वाजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment