अंधार होता फार झाला
आता निदान उजेड तरी आहे
शिशिर पान गाळून गेला
आता किमान अंकुर फुटतो आहे
सूर्य अस्तांचलास गेला तरीही
आशेच्या इवल्या चांदण्याचा प्रकाश आहे
वाट बिकट धुकेभारली तरीही
पावलांपुरता उजेड पुरेसा आहे
आता नकोत स्वप्ने भव्य दिव्य मोठी
आहे तितुके राहिले तरी फार आहे
सौ.पूर्वा लाटकर
Comments
Post a Comment