लॉकडाउन दिवस 1

लॉकडाउन दिवस 1

सुप्रभात.    
प्रत्येक निर्णयाचे काही फायदे अIणि तोटे असतात.
परवा मोदींच्या निवेदनाने मन हबकुनच गेले.काहीशी निराशा,भिती ,एकटेपण ,जबाबदाय्रा .काळजी सगळ्या भावना एकत्र दाटुन अIल्या.जेवायला मस्त पुलाव केला होता पण इच्छाच होत नव्हती.कसाबसा गारढोण पुलाव घशाखाली ढकलला.दुसय्रा दिवशी गुढी ऊभारण्याची पण मनाची तयारी होत नव्हती.दुरच्या एका बिल्डिंगमध्ये भगवी गुढी ऊभारलेली बघीतली अाणि मनानेही ऊभारी घेतली.
अIहे त्या साहित्यात ,अLहे त्या परिस्थितीत गुढी ऊभारली.अIज सकाळ ऊजाडली .कालच्या पावसाने झाडे सुस्नात झाली अाहेत.रस्त्यावरची वाहने बंद झाल्याने पोल्युशन एकदम कमी झाले अIहे.हवेत किंचीत गारवा,प्रसन्नता अाहे.पोपटांचे थवे किर्रर्र अावाज करत अाकाशातुन झेपावतांना दिसत अIहेत.भारद्वाजाचा भरदार ,घूमावदार अावाज स्पष्ट ऐकु येतोय.कोकिळेची कुहुकुहु दिवसभर चालू असते.अIपण लॉकडाऊनमध्ये अाणि पक्षी ऊडतांना पाहुन जरा जेलस व्हायला होतंय. अांब्याचा मोहर जाऊन छोट्यामोठ्या कैय्रांचे घोस लगडले अIहेत.पोपटी पालवी मन मोहुन घेतेय.अIकाशाची निळाई मन शांतवते अIहे.दुधाची पिशवी अात घेणे अIणि केराचा डबा बाहेर देणे याशिवाय मेन डोअरला हातही लागत नाही.दोन वेळचा चहा अI+णि साधे जेवण असा अIहार ठेवलाय.असलेली भाजी ,कडधान्य पुरविणे.वेळेला अIमटी भात खायची पण तयारी अाहे.पण घराबाहेर पडायचेच नाही असा ठाम निश्चय केलाय.निदान एकविस दिवस तरी.बाकी काळजी घेणे चालूच अIहे.तुम्ही सगळ्यांनी पण काळजी घ्या. अIणि हो एक सांगायचं राहिलं अIजुबाजुला शांत ,निवांत,सुशेगात वाटतंय पुण्या राहुनही अलिबागचा फिल येतोय .नारळी पोफळी फक्त दिसत नाहीयेत.🌴    🔒🔒🔒🔒लॉक लावायचं राहिलंच ना!       

Comments