लॉकडाऊन 2.0 संपत अालाय

🔒🔒🔒लॉकडाऊन 2.0 🔒🔒28.4.2020.🔒




      लॉकडाऊन 2.0 पण संपत अालाय अाणि या विषाणूचा संसर्ग ,धोका वाढतांनाच दिसतोय.हा विषाणू दिसत नसला तरी शरीराला हानी पोहोचवतोय.पण जे अाज लॉकडाऊनमध्ये घरी अाहेत त्यांची मने अाणि मेंदु पण कुरतोडतोय.रोजचा संसर्गाचा वाढता अाकडा,विविध वृत्त वाहिन्यांवरील बातम्या,मान्यवरांचे विश्लेषण,अारोग्य मंत्र्यांची रोजची कव्हरींग्ज,माननीय मुख्यमंत्र्यांचे दिलासादायक भाषण,करत असलेल्या ऊपाययोजनांचा अाढावा.'तुम्ही खबरदारी घ्या.मी जबाबदारी घेतो'किंवा  राजेश टोपेंचं 'मीच माझा रक्षक'अशी विधानं.'स्टे होम स्टे सेफ'ही दीर्घकाळ स्मरणात राहतील.मध्येच WHO काय म्हणतंय? लस कधी येणार?चीनने पाठवलेली टेस्ट कीटस बोगस ,अाता कोरीया नवीन टेस्ट कीटस बनवतंय.मध्येच  ICMR चे डॉ.गंगाखेडकर काय म्हणतायतं?अॉक्सफोर्डची चाचणी यशस्वी होईल ना? सीरम इन्स्टीट्युटचे अदर पुनावालांचा विश्वास .त्याची तयारी.पैशांचा ,मदतीचा ओघ पंतप्रधान निधीकडे?की मुख्यमंत्र्यांकडे सोपवायचा?सिंगापुरमधुन अार्टिफीशीयल इंटेलिजन्सचे वेगळेच रिपोर्ट येत अाहेत.भारतातले अायअायटियन्स अाणि अायटियन्स रोज वेगवेगळे प्रोजेक्टस,प्रेझेंटेशन्स अाणताहेत.मध्येच 'ज्ञानदा चव्हाण' ,प्रसन्न जोशी यांचे ताजे अपडेटस असतातच.पुण्याचा रीपोर्टर मंदार गोंजारी ,मिकी घई अापलीच अाप्तेष्ट असल्यासारखी वाटत अाहेत.
 मध्येच मोदी ऊद्या कोणती धोरणं अाखणार,काय बंद,काय चालु?कोणत्या ऊपाय योजना?मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न कसा हाताळणार?बेरोजगारीचं संकट,अार्थीक अडचणी ,शेअर मार्केटचे चढ नाही तर ऊतारच.
अाधीच घरी बसुन मेंदुला अक्षरश: गंज चढु लागलाय त्यात वरच्या सगळ्या घडामोडींनी  मेंदुला झिणझिण्या येत अाहेत.म्हणुनच म्हणतेय हा विषाणु मनामनांत भिती,गोंधळ,अफरातफर,नैराश्य,कंटाळा,ऊबग निर्माण करतोय.मन ,मेंदु पोखरतोय वाळवीप्रमाणे.
असो.लॉकडाऊन पुन्हा वाढणार अाहेच.अाता कंटाळ्याचाही कंटाळा येईल .पण तयारी करायला हवी मनाची!अाहात ना तय्यार तुम्ही सगळे लॉकडाऊन 3 मध्ये जायला! तोपर्यँत घरी रहा,सुरक्षित रहा.🔒🔒 सौ.पुर्वा लाटकर.🔒🔒

Comments