लॉक डाऊन डायरीज- 4

🔒🔒🔒लॉक डाऊन डायरीज         

     अाज सहजच थोड्यावेळापूर्वी मनांत विचार अाला.बरं झालं बाहेर खाण्याची,हॉटेलिंगची ओढ नाहीये ती.नाहीतर अाजच्या काळात तो एक अस्वस्थपणा अाला असता.गेली अनेक वर्षे जे काही पदार्थ करायचे ते घरिच असा नकळत पायंडा पडत गेला त्यामुळे करण्यातली मजा ,अनुभव फसलेले ,यशस्वि झालेले प्रयोग.केलेल्या पदार्थांचं कौतुक .हे भिनत गेलं.काळानुसार पदार्थ अाणि त्यांनी राज्याच्या सोडुन देशाच्या सीमा ओलांडुन थेट स्वयंपाक घरात प्रवेश केलाय.इडली,डोसा,ऊत्तप्पा,मेदुवडा, पंजाबी छोले भटुरे,राजमा चावल.देशी चायनिज मधले मांचुरियन.शेझवान राईस ,हक्का नुडल्स,मंचाव सुप.काॅर्नसुप ,सगळ्यांचा अावडता पिझ्झा.वडापाव मधला (पाव सोडुन )वडा.मिसळ ,कबाब, पॅटीसमधले अनेक प्रकार.जीरा राईस दालफ्राय ,जंत्री खुप मोठी अाहे.बाकी तुम्ही जे करतांय ते तर अाहेतच.अाज पुण्यात राहतांना बघीतलं अर्धं पुणं शनिवार ,रवीवारी  बाहेरच्या खाण्यावर जगतंय.सगळी छोटी मोठी हॉटेल्स.,रेस्टॉरंटस .खाण्याच्या गाड्या खाऊ गल्ल्या गर्दिने ओसंडुन वाहात असतात.अर्थात काहीजण गरज म्हणुन,विद्यार्थि ,नोकरदार काहीजण नाईलाज म्हणुन बाहेर खातात.पण बरेचजण जिव्हातृप्त करण्यासाठी ,चेंज म्हणुन !स्वयंपाकाचा कंटाळा म्हणुन तर ,काही जण पाहुण्यांना ट्रीट म्हणुन .वाढदिवस.पहिला पगार.अनेक प्रकारचं सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर वळतात.काही वेळा घरं छोटी असतांत म्हणुन पण बाहेर जेवण्याकडे कल असतो.पण 'चरैवेती चरैवेती' म्हणंत पुणं अाणि पुणेकर बाहेर चरत असतांत.अाज ईकडची मिसळ फेमस अाहे .ऊद्या तिकडचा वडापाव टेस्टी अाहे.म्हणत नवनवीन शोध घेत असतांत.अमुक ठिकाणची मिसळ खाल्ली नाही अजुन?नाही !म्हंटल्यावर असा काही चेहरा होतो जणु कांही अाग्य्राला जाऊन ताजमहाल बघीतला नाही.एखाद्या ठिकाणची कचोरी,दाबेलि किंवा पॅटीस खाल्लं नाही तर जणु तुम्ही घोर अपराध करत अाहात अशा दृष्टीने पाहिलं जातं.अाज मी फलाण्या फलाण्या ब्रँडचा पिझ्झा ट्राय केला      ..हा खास पुणेरी बाणा बरंका. सरळ खाल्ला.गिळला ,नरड्याखाली टाकला असं नाही म्हणंत.क्रीया एकच पण सॉफिस्टिकेटेड वाटायला हवी.अाज घर बसल्याहि कोणत्याही हॉटेलमधुन हवं ते हवं तेंव्हा पदार्थ मागविण्याची सोय झालीय.त्यामुळे अॉर्डर मागवा.कुठेहि न जाता अापल्या पोटाची अाणि रसनेची सोय होते.

Comments