🔒🔒🔒लॉक डाऊन डायरीज .सहावा दिवस.🔒🔒
'कम्युनिकेशन ......एक इमोशनल टच' 🔒🔒
सतराव्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी महेश्वर ते पुणे अशी डाक व्यवस्था चालु केली.पदमसि नेन्सी नावाच्या संस्थेकडे त्यांनी हे काम सोपवले होते.डाक ने अाण अाणण्यासाठी दुतांच्या २० जोड्या होत्या.डाक हे असं पहिलं वहिलं संदेश पोहचविण्याचं साधन होतं.त्यानंतरही डाक,तार हे एकमेकांशी संवादाचं साधन गेली अनेक वर्षे होते.अाधी तारेचा कडकट्ट अावाज कायमचा बंद झाला.हळुहळु पोस्टात पडणारी पत्रे पण बंदच झालीत.टेलिफोन .....तो काळा ढब्बु , बोटाने नंबर फिरवत गोल गोल डायल टिर्र टिर्र वाजणारा फोन एखाद्या घरीच असायचा. नंतर BSNL ने घरोघरी फोन दिले.बटणे दाबत तो फोनही खुप छान संपर्काचं माध्यम होता.नंतर मोबाईल अाला.'कर लो दुनिया मुठ्ठीमें' म्हणत प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसु वागला.लोकं गरजेपेक्षा जास्तच बोलु लागली.खय्रा संवादा पेक्षा चौकशी अाणि लक्ष ठेवण्यासाठीच याचा वापर अधिक झाला.त्यानंतर हाच मोबाईल 'स्मार्ट' झाला .त्यावर असलेलं व्हॉटसअप ,फेसबुक हे वेगवेगळे अॅप न बोलताही संवाद साधु लागली.नवनविन ग्रुपस तयार झाले .जुन्या मित्र मैत्रिणी,नातेवाईक,अॉफिस कलिग्ज,एका बिल्डिंगचे सोसायटी ,वेगवेगळ्या छंदांचे ,समविचारांचे ,अाध्यात्मिक असे ग्रुप तयार झाले.'नऊ दिवस नव्याचे' म्हणत या सगळ्या ग्रुपचा ऊत्साह पण ऊतरती कळा घेऊ लागलाय.मोरपिसासारखे अलगद बोट फिरवुनही कनेक्ट करणारा,मेसेज देणारा फोन 'स्मार्ट' झालाय पण माणूस जरा अतिस्मार्ट झालाय.मनाचा पिसारा जणु झडुनच गेलाय.कोणी मेसेज पाठवायचा?कोणी फोन करायचा? कुठेतरी हा 'मी' अाडवा येतोय.अतिपरिचयात अवज्ञा अशी या मोबाईलमुळे स्थिती झालीय.इमोशनल डिस्टंन्स वाढलंय.मोदीजींनी सांगितलंय 'सोशल डिस्टन्स बढाओ और इमोशनल डिस्टन्स घटाओ.' या अाणिबाणिच्या परिस्थितीत एवढं तरी फॉलो करुया.

Comments
Post a Comment