लॉक डाऊन .....एक ठहराव.

🔒🔒लॉक डाऊन डायरीज.चौदावा दिवस.7.4.2020🔒🔒लॉक डाऊन .....एक ठहराव.


               
माझ्या अाजुबाजुला खुप शांतता,स्तब्धता अाहे.तुरळक ये जा करणारी माणसे.एरवी भर रहदारीचा असणारा रस्ता चिडीचुप अाहे.एखादं दुसरं वाहन.एखादी टु व्हिलर फोर व्हीलर जातांना दिसतेय.ऐन एप्रिलच्या ऊन्हाळ्यात झाडे पण ऊन्हं झेलत.मूकपणाने ऊभी अाहेत ,जणू त्यांच्यातलं चैतन्यच हरवलंय.ती पण हलायची ,सळसळायची विसरली असतील का? की मानवजातीवर अालेल्या या संकटामुळे अापली सहवेदना दाखवत असतील? अांब्याला कैय्रा लगडुन तयार अाहेत.पण कुठे अाहेत ती हिरहिरीने कैय्रा पाडणारी ती छोटी मुले?कैय्रांचा भार सांभाळत अांबा पण मान टाकुन बसलाय.एव्हांना हॉल,बेडरुम,गॅलरी ,किचनमधून दिसणारी तीच ती दृश्ये पाहून अापणही थकलोय.पुस्तकं वाचुन झाली.जप,स्तोत्रे म्हंटली.इडीयट बॉक्स हा अाता त्या त्या भयानक बातम्या बघुन लॉक डाऊन केलाय,स्मार्ट फोनवरचं सर्फिंग अाता निरर्थक  वाटतीय त्यामुळे तोही दूर सारावासा वाटतोय.अडगळ अावरुन झाली.कपाटं अावरली.रद्दी नीट लावली.पुस्तकांच्या कपाटावरची धुळ झटकली.विविध पदार्थ करण्याची हौस भागवून घेतली.फोनवर गप्पा झाल्या .रोजची झाडु फरशी,भांडी,ऊष्टीखरकटी अाहेतच तरीही 'तो' ऊरतोच. वेळ.अवकाश .अचानक लागलेल्या ब्रेकने माणसे हवालदिल झालीत.काय या वेळेचं करायचं काय?संगीतात,शास्रिय गायनात ,गाण्यात एखादा बारीकसा ठहराव पण गाण्याची ऊंची कैक पटीने वाढवतो.अापल्या तोंडुन सहजच 'वा क्या बात है!' असे ऊद्गार बाहेर पडतात.एखाद्या गाण्यातला 'पॉज' हवाहवासा वाटतो.ती जागा पुन्हां पुन्हां ऐकाविशी वाटते.पण सध्या अचानक अालेल्या या ठहरावाने अायुष्य ठप्प झालंय.रोजच्या धावपळीत विश्रांती हवी असते.खुप वेळ वाट चालुन एखाद्या पांथस्थाला डेरेदार वृक्षाखालची थंडगार सावली अाणि

पाण्याचे दोन घोट नवीन ऊर्जा देतात.ते क्षण ,तो किंचीत विसावा त्याला पुढची वाटचाल संपेपर्यंत त्याला बळ देणारी असते.पण अात्ताच्या परिस्थितीत अालेला हा 'ठहराव' नकोसा वाटु लागलाय.जीव गुदमवणारा.वाटतोय.खरंतर अापण सगळे घरी अाहोत,सेफ अाहोत.सगळ्यासोयी सुविधा अाहेत तरीही एखाद्या पक्षाप्रमाणे ,बंदिस्त घरात नकोसं वाटतंय.वर डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार अाहेच.लॉकडाऊन लवकर संपणार नाही.वाढणार अाहेच.प्रतिक्षा........एक दिर्घ प्रतिक्षा ....हा 'ठहराव' संपण्याची .🔒🔒🔒लॉकडाऊन संपण्याची वाट पहाणारी ....सौ.पुर्वा लाटकर.🔒🔒🔒😔

Comments