🔒🔒लॉक डाऊन डायरीज.🔒🔒🔒 ३१.३.२०२० सातवा दिवस.
'भय इथले संपत नाही.🔒🔒 एखादं द्रृष्ट स्वप्न पडतं अाणि अापण घाबरुन,दचकुन ,घामेघुम होत झोपेतुन जागे होतो.दुसय्रा दिवशी ऊठल्यावर ते स्वप्न होतं असं लक्षात अाल्यावर हायसं वाटतं.पण अाज जे भयाण,भयावह असा धुमाकुळ अदृश्य अशा विषाणुने घातलाय तो अनाकलनिय अाहे.अकल्पित असा अाहे.एकविसाव्या शतकातही यावर ऊत्तर सापडत नाहीये.मानवी कल्पनेच्या पलिकडचाअसा घोर संहार त्याने चालविला अाहे.लाखो बळी घेऊनही त्याची वाटचाल चालुच अाहे.गोष्टीतला काळाकभिन्न ,अक्राळविक्राळ राक्षस दिसायचा तरी.या 'राक्षसात' जीव नाही'तो दिसतही नाही.अदृश्य रुपात तो सगळीकडे दबा धरुन बसलाय.असं वाटतंय एखादं वादळ हळुहळु वाटचााल करत भारतावर येतंय.अर्ध्याहुन अधिक जगाचा कब्जा घेतल्यानंतर त्याची नजर या देशाकडे वळलीय.पण माझा देश गरिब अाहे.त्याच्याकडे पुरेशा सोयीसुविधा नाही.अार्थिक पाठबळ तुटपुंजं अाहे.इथले अनेक लोक अडाणी,अशिक्षित अाहेत.सामान्य माणसाला लागणाय्रा सामान्य गरजा सुद्धा पूर्ण करायला ते हतबल अाहेत.इथली प्रचंड प्रमाणात असलेली लोकसंख्या पण काळजीचं कारण अाहे.शासन सगळीकडुनच प्रयत्न करतंय.डॉक्टर्स,पोलिस.अधिकारी,नेते,समाजसेवी संस्था जनजागृती करत अाहेत.अत्यावश्यक सेवा पुरवित अाहेत.पण काहींना हा राक्षस अगदी ऊंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलाय याची जाणीवही नाही.असा समाज घात करु शकतो.दंडुके पडल्यावरच जाग येतेय.एकशेतीस कोटी जनतेवर शासनाने नजर ठेवावी ही अपेक्षा फोल अाहे.अगदी इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडा असे वारंवार सांगुनही इथले लोक कायद्याचं ऊल्लंघन करत अाहेत.पण 'मी घराबाहेर पडणार नाही,हा ऊंबरठा ओलांडणार नाही' अशी प्रतिज्ञा कोणी करतांना दिसत नाहिये.अमेरिका,ईटली,स्पेन या देशांकडुनही काही बोध घेतांना दिसत नाही.दुध,किराणा,भाजी हे अाण ते अाण.सकाळचा फेरफटका,कुत्र्यांना फिरवणं .ऊगीचच पाय मोकळे करायला बाहेर पडणं .हे बघीतलं की चीड येते.शत्रु खुप मोठा,वेगाने पसरणारा अाणि जीवावर बेतणारा अाहे.याचं भान अाता प्रत्येकाला अालंच पाहिजे.अन्यथा येणारे दिवस कोणता रंग दाखवतील याचा विचारच न केलेला बरा.काळजीचे गडद ढग मनावर धडका मारत अाहेत.हे दृष्ट स्वप्न सगळ्या जगावरुन लवकर संपु देत .हीच प्रार्थना.

Comments
Post a Comment