🔒🔒लॉक डाऊन डायरीज.🔒🔒3.4.2020🔒🔒अाज दहावा दिवस.🔒
मंडळी खरं तर तेच तेच बोलून ,एेकुन अाणि विचार करुन सगळीकडे खुपच निगेटिव्हिटी पसरलीय ,पण अाज माझा मस्त फ्रेश मुड अाहे अाणि गेल्या काही दिवसांत लॉकडाऊनमुळे निसर्गावर काय चांगले परिणाम झाले अाहेत ते बघुया!अापली ही पृथ्वि हिच्यावर गेल्या अनेक वर्षांत मानवाकडुन खुप अन्याय झाला.त्यामुळे निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडला होता.ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात वाढलं होतं.हवा,पाणी,ध्वनि यांचं प्रदुषण कैक पटींनी वाढलं होतं.जमिनिचा पोत बिघडला होता.निसर्गाचे चक्रच ऊलटे पालटे होऊन ऊन्हाळा,हिवाळा, पावसाळा यांचे येणे त्यांच्या मर्जिनुसार चाललंय.पण अाता लॉकडाऊनमुळे ही पृथ्वी मोकळा श्वास घेऊ लागली अाहे.हवेतील प्रदुषण कमी होऊन हवा स्वच्छ,शुध्द झालिय.अॉक्सिजनचे प्रमाण वाढल्याने अापणही हा अनुभव घेऊ शकतोय. हवेतील प्रदुषणामुळे गेली अनेक वर्षे पृथ्विच्या ओझोनच्या थराला मोठे भगदाड पडलं होतं.पण अाता हे कमी होतांना दिसत अाहे.अाणखी एक बाब संशोधनाअंती निदर्शनास अाली ती म्हणजे पृथ्वीची थरथर किंवा हादरणं कमी झालंय.बांधकाम,ऊत्खननं,विमान ऊड्डाणे ,कारखाने यामुळे अनेक घाव पृथ्वी निमुटपणे सहन करायची पण अाता ती शांत झालीय.लहानातला लहान भूकंप,पृथ्विची घडामोड अाता शास्रज्ञांना मोजता येऊ लागली अाहे.जे अनेक वर्षांत जमलं नव्हतं ते संशोधन अाता मार्गी लागतंय.नद्याचं ,समुद्राचं प्रदुषण घटल्याने जलचर मुक्तपणे विहार करत अाहेत.काही ठिकाणी डॉल्फिन्सचं दर्शन झालं.अाजच एके ठीकाणी वाचलं पंजाबमधल्या जालिंदरमधुन बर्फाच्छादित हिमालयाचे दर्शन होतेय.खुप वर्षांत जे हवेच्या गढुळपणाने झाकले गेले होते.ते पाहुन जालिंदरवासी सध्या अाश्चर्य अाणि समाधान व्यक्त करत अाहेत.प्राणी ,पक्षांवर देखील मोठा सकारात्मक बदल होतांना दिसतोय.मुंबईत भरवस्तीत मोरांचे दर्शन होतेय.हरणांचे कळपच्या कळप बोरीवलीतील नॅशनल पार्कमध्ये रस्त्यांवर येउन अारामात संचार करतांना दिसत अाहेत.पुण्यातही घराजवळ पोपटांच्या थव्यात वाढ झाली अाहे.अाकाशाचा निळसर रंग अधिक गडद दिसु लागला अाहे.असे छान छान बदल अाजुबाजुला घडत अाहेत.लॉकडाऊनमुळे ही अवनी अनलॉक झाली अाहे.याचे सकारात्मक परिणाम अापल्याला अाणि पुढील पिढ्यांना मिळतीलच.अापली 'मदर अर्थ 'हॅपी तर अापणही हॅपी होणारच ना!🔒🔒🔒🔒

Comments
Post a Comment