अाज जागतिक योग दिवस अाणि जागतिक संगीत दिवस असा मस्त दुग्धशर्करा योग जुळुन अाला अाहे.खरंतर दोन्ही दिवस अायुष्यात अानंदी बनवतात.शरीर जर निट असेल तर सगळ्याच गोष्टींचा अानंद घेता येतो.सतारीप्रमाणेच शरीरातल्या तारा ओढुन ,घट्ट ताणून खुंटीला बसविल्या की जीवनाचे सुर सुरेल बनतात.त्यासाठी योगा अावश्यकच अाहे.गाण्यात ज्याप्रमाणे  अारोह,अवरोह,अालापीला महत्व अाहे त्याप्रमाणेच.श्वासाचे अारोह,अवरोह एका संथ लयीत असणे गरजेचे.प्राणायामाने हे साधता येते.तबल्यावर ज्याप्रमाणे कातडे ओढुन,ताणुन बसवले की तबल्याचे बोल छान वाजु लागतात.तसेच शरीराला पण थोडा शिस्तीचा बडगा,स्वयंप्रेरणेच्या हातोडीचे  हळुवार ठोके दीले की शरीरही छान बोल ऊत्पन्न करतं.योगाने मन अाणि शरीराचे एकत्रिकरण होते.संगीत अाणि योगाचा जर सुरेल मेळ घातला तर अायुष्य सुरेल मैफिलीसारखे होते.संगीत मनाचा तणाव दूर करते तर योगाने शरीरावरचा ताण नाहिसा होतो.अाजवर संगीत न ऐकलेला व अावडणारा माणुस दुर्मिळच.पण योग न करणारे अनेकजण अाहेत .अाजच्या या जागतिक योगदिनापासुन योग चालु केला तर रोजच्या निरस अायुष्याचे अानंदी गाणे होईल.मग करणार ना योगा अाजपासुन! अाणि हो मी रोज करतेय म्हणुनच सांगु शकतेय........सौ.पुर्वा लाटकर.

Comments