'मसाला म्युझीक'

🎼🎼     'मसाला म्युझीक'

                         अाता तुम्ही म्हणाल ही काय भानगड अाहे?हो !सांगते सांगते! तर झालं असं की बरणीतला गोडा मसाला संपत अालेला.अगदी बरणीचा तळ दिसु लागल्यावर खडबडुन जाग अाली.घरात मसाल्याचे सर्व जिन्नस होते हो !पण काय अाज करु ऊद्या करु नुसती चालढकल अाणि अाळस!शेवटी अाज मसाल्याचा प्रश्न मार्गी लावायचाच या निर्धाराने ऊठले .'हर हर महादेव'च्या अावेशात तलवारीसारखा झारा जोशातच हाती घेतला.अाणि कामाला सुरवात केली.तत्पुर्वि माझ्या मोबाईलचं एफ.एम.चालु केलं.वेळ साधारण अकराची .वार शनिवार.त्याच वेळी अरुण दाते यांचे सुपुत्र यांची अाकाशवाणीने घेतलेली मुलाखत लागली.मस्त गाणी,गप्पा चालु होत्या.अरुणजींच्या अनेक अाठवणी ,किस्से हळुवार ऊलगडत होते.एकीकडे माझे हात चालु होते.बघता बघता एक एक जिन्नस भाजुन वेगळे ठेवत होते.अधुन मधुन वाजणारी गाणी अाणि माझ्या कामाचा वेग दोघांचेही छान सुर लागले होते .साधारणत:
साधारणतत:  तासभर हा कार्यक्रम चालु होता.तासाभरात माझा मसाला भाजुन
कुटुन (म्हणजे मिक्सरवर ) तयार झाला.कोणत्याही कामाला संगीताची जोड लागली की काम कसं हलकं वाटु लागतं. घरातली साफसफाई,अडगळ ,अावराअावरी ,पुसापुशी करतांना बॅकग्राऊंडला अापलं अावडतं संगीत मग ती गाणी असोत.शास्रिय संगीत असो,गझल,भावगीत,भक्तिगीत.सुगम संगीत अथवा सतार,बासरी ,तबला जलतरंग,सरोद यासारख्या वाद्यांची सुरावट.सगळा शीण घालवुन काम करायचं बळ येतंअंगात.मोठमोठ्या कामाचे डोंगर सहजी हातावेगळे होतात.खरकटी भांडी घासतांनाही एक लय साधली जाते.थोडक्यात काय संगीतात सगळे रोग बरे करण्याची जशी जादु अाहे. तशी तुमचा अाळस घालवुन कामाचा मस्त मुड परत अाणायची खासियत सुद्धा अाहे.तर असा हा 'मस्ती म्युझीक मसाला' .थांबते इथेच तो परातमसाला बरणीत भरण्यासाठी वाकुल्या दाखवतोय.तुम्ही पण ट्राय करायला हरकत नाही,दिवाळी जवळ येतेय,साफसफाई करायची असेलच ना! अहो ऊठा लागा कामाला वाचत काय बसलाय!



Comments