जयश्री..वैशालीस पन्नासाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

🍥🍥🍥🍥🍥🍥🍥             प्रिय मैत्रिण सौ.जयश्री..वैशालीस पन्नासाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.                                     जयश्री सांगलीसारख्या शांत,निवांत शहरात वाढलेली तु.प्रेमळ अाईवडीलांची लाडकी लेक.एकुलत्या एक भावाची मोठी अाणि अावडती ताई.खुप साय्रा मैत्रिणी.नातेवाईक.यांच्या सहवासात मोठी झालीस तु.पदविपर्यंतचे शिक्षण घेऊन सांगली बँकेत नोकरीही लागली तुला.लग्न झालं अाणि अाणि सगळ्यांना सोडुन अलिबागला अालीस.मुळातच तुझा स्वभाव म्हणजे 'मुरडीचा कानवला'( ,बहुतेक पाठवणी करतांना अाईने हाच केला होता).संसारात हाच मंत्र जपत,सगळ्यांना सांभाळत तुझा संसार  सुरु होता.लाडक्या लेकाचा अभिजितचा जन्म हा तुझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला.मग तुझं सगळं अायुष्यंच त्याच्या भोवतीने विस्तारु लागलं.त्याच्या अायुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही दोघांनी केलेली अॅडजेस्टमेँट        अाज त्याच्या यशस्वी अायुष्याच्या रुपात दिसत अाहे.संसाराच्या सगळ्या जबाबदाय्रा.कुळाचार,पै पाहुणा ,अालागेला तु सगळं समर्थपणे पार पाडलंस .त्यात तुझ्या स्वत:च्या तब्येतीचे पण अनेक अडसर होते ,ते सगळं सांभाळत तु हसतमुख होतीस.तुझी एक जबाबदार नजर सांगलीकडे ..अाईबाबा ,भावाकडे लागलेली असायची.अडचणींना धावुन जात असतांना वेळेचं अाणिअंतराचं गणित तुझ्या डोक्यात नसायचं.अाता तर अलिबाग,पुणे,सांगली,फलटण सगळीकडेच लक्ष ठेवतांना तुझी अजुनच धावपळ होतेय.सासु,सासरे त्यांच्याप्रती असलेल्या जबाबदाय्राही तु कुरकुर न करता पार पाडल्यास.अर्थात या सगळ्यासाठी तुझ्या यजमांनाची साथ,मदत भक्कमपणे अाहेच.              वयाच्या या टप्प्यावर मागेवळुन पाहतांना अाजवर केलेली धडपड ,अाटापिटा अाणि त्याचं मिळालेलं फळ याचा हिशोबही मन करत असेल.गेली काही वर्ष अापल्या ग्रुपमुळे तुला थोडा विरंगुळा ,अाधार अाणि हक्काच्या मैत्रिणींमुळे अानंदाचे क्षण तुझ्या वाट्याला अाले असतील.अाज या सगळ्याचा कळस म्हणजे कौतुक सोहळा अाहे.                                               शेवटी जाता जाता म्हणेन 'सांगलीची कृष्णामाई अलिबागच्या अरबी सागरास मिळाली.सागराचा खारटपणा स्वत:कडे घेऊन सगळ्यांचीच अायुष्य मधुर बनवली.'पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा🍥🍥🍥🍥🍥🍥   
       टीप: दवदव करु नकोस.जप स्वत:ला.🌴🌴🌴



Comments