स्वत:चा ब्लॉग !!

🔒🔒🔒लॉक डाऊन डायरीज .तेरावा दिवस.6.4.2020.🔒🔒



अाज मला खुप अानंद होतोय कारण माझा स्वत:चा ब्लॉग तयार केलाय.अाता माझे सगळे लेख.विचार मला पब्लिश करता येत अाहेत तसेच सेव्ह पण करता येतील.अाजवर बरेच लेख लिहिले.ते व्हॉटसअपवर पाठवले अाणि डीलिटही झाले अापोअाप.खुप वर्षांपुर्वि सकाळला लेख पाठवला होता पोस्टाने.लिफाफ्यात..कागदावर लिहीलेला.साधारण एक दीड महिन्याने तो छापुन अाला.लेख पाठवल्याचं घरी कोणालाच सांगीतलं नव्हतं.'अहो'ची सकाळची शिफ्ट होती.त्यांचा फोन अाला 'अगं तु सकाळला लेख पाठवला होता का?मी हो म्हंटलं,का हो?'अगं तो अालाय छापुन सगळ्यांनी वाचला.मी जरा ऊडालेच ,क्काय ?माझा लेख छापुन अाला? नक्की ना?लेखातल्या काही ओळी वाचल्यानंतर माझी खात्री पटली.पण अामच्याकडे तेँव्हा नेमका मटा यायचा.शेजारीपाजारी विचारलं पण मला सकाळ मिळाला नाही.शेवटी अार.सि.एफ.च्या लायब्ररीत पेपर मिळाला.अधाशासारखा वाचला अाणि 'अाज मैं ऊपरअासमाँ निचे' अशी अवस्था झाली होती.नंतर तो लेख .एन्ट्रन्सला काचेच्या नोटीसबोर्डवर पण लावला होता.पुढे अनेक लेख सकाळला पाठवले अाणि छापुनही अाले.कोमसापचं (कोकण मराठी साहित्य परिषद) अाजीव सदस्यत्व घेतलं अाणि तिथेही माझ्या लिखाणाला दर्दी अाणि सुजाण वाचक भेटला,पाठीवर कौतुकाची थापही पडली.अाता स्मार्ट फोन अाल्यावर सगळं लिखाण यावरच केलं जातंय.पटकन टायपून हव्या त्या इमोजीज टाकुन फॉरवर्ड करायचा नादच लागला.त्यामुळे अनेक जणांपर्यंत माझं लिखाण विनासायास पोहोचु लागलं.                  अाता पुढचा टप्पा  ब्लॉग लेखन .माझी लेक ..चैत्राली बरेच दिवस मागे लागली होती.अाई ब्लॉग तयार करु.मागच्यावेळी ती अाली तेँव्हांच प्रयत्न केला होता पण यशस्वि नाही झाला.या लॉकडाऊनच्या काळातलं माझं लिखाण बघुन तीला परत हुरुप अाला माझा इमेल अायडी.पासवर्ड मागवुन तीने ब्लॉग तयार केला.पहिला लेख टाकला.पुढचे लेख कसे टाकायचे हे सांगीतलं अाणि 'रामनवमी'च्या सुमुहुर्तावर माझं स्मार्ट बाळ....ब्लॉग तयार झालं.असा अाहे या ब्लॉग निर्मितीचा प्रवास .ते पण वर्क फ्रॉम होम करत.घरचंही सांभाळत माझ्या अडाणी प्रश्नांना ऊत्तरं देत ब्लॉग तयार करायचं काम केलंय.असो.या लॉकडाऊनचा असाही सदुपयोग.🔒🔒अाज पुन्हां 'अाज मैँ ऊपर अासमाँ निचे 'अशा तरल अवस्थेतील...........सौ.पुर्वा लाटकर .पुणे.🔒🔒

Comments