लॉक डाऊन डायरीज.......अकरावा दिवस

🔒🔒लॉक डाऊन डायरीज.4.4.2020🔒🔒अकरावा दिवस.🔒🔒                    


एव्हांना या लॉकडाऊनच्या कंटाळवाण्या दिवसांना तुम्ही सगळे सरावला असाल.अापल्या 'शत्रुबद्दल' पुरेशी माहितीही मिळाली असेलच.बातम्या,वर्तमानपत्र,फॉरवर्डेड व्हॉटसअप मेसेजेस,व्हिडिओज यातुन काय करावं.काय करु नये याचे भान तुम्हां सगळ्यांना अालंच असेल.पण अाज याबद्दलच मी थोडी अधिकची माहिती द्यायचा प्रयत्न करणार अाहे.कदाचित ही माहिती तुम्हांला असेलही ,असलीच तर चांगलं अाहे.नसेल तर काही मुद्दे राहुन गेलेले लक्षात अाणुन द्यायचा हा प्रयत्न.अाज सगळे घरी अाहोत.सुरक्षित अाहोत.पण  बाहेर जावं लागलंच तर ,जातांना मास्क 'अत्यावश्यक' अाहे.नसेल तर रुमाल ,स्कार्फ,ओढणीचा वापर करावा.नाक अाणि डोळ्याबरोबरच अापले केसही पूर्ण कव्हर करावेत.शक्य असल्यास गॉगल,चष्मा घालावा.शक्यतो कमीत कमी वेळात अापली कामे ऊरकावीत.गर्दी टाळून ,सोशल डिस्टंसिंग कसे राखता येईल हे बघावे.बाहेरुन अाल्यावर इकडे तिकडे स्पर्श न करता बाथरुम गाठावे.हात पाय धुण्यापेक्षा सरळ अांघोळ करावी.बाहेरचे कपडे लगेच,स्कार्फ .इत्यादी साबणाच्या पाण्यात डेटॉल टाकुन भिजवावेत.अाणलेले सगळे प्लास्टीकने कोटेड असे सामान गरम पाणी,डेटॉल मधुन काढून मग साध्या पाण्याने धुवावे.भाज्या,फळे पण गरम पाण्यातुनच धुवून घ्या.गरम पाण्यात हा विषाणु जिवंत राहू शकत नाही.पालेभाज्या ,कोथिंबीर इत्यादींचा वापर प्रमाणात ठेवावा.अाता सगळे सामान,किराणा पुन्हा ऊन्हात ठेवावा.औषधांच्या स्ट्रीप्सदेखील डेटॉलने पुसुन घ्याव्यात.तसेच घराची किल्लि,गाडीची किल्ली साबण ,डेटॉलने धुवावी.चष्मा,गॉगल्स डेटॉलने पुसुन घ्या.किराणा ,भाजी अाणण्यासाठी नेलेली पिशवी धूवावी.किंवा घराबाहेर 24 तास कोणाचाही हात लागणार नाही अशी ठेवावी.दुधाच्या पिशवीलाही साबण,डेटाॅलच्या पाण्यात व्यवस्थित धुवावी ,मगच वापरावी,वरची प्लास्टिकबॅग पुन्हा हात लागणार नाही अशा रीतीने केराच्या डब्यात टाकावी.घरातही ज्या ठिकाणी वारंवार हात लागतो अशा ठिकाणी डेटॉलने पुसुन निर्जंतुकीकरण करावे.दाराचे नॉब.कड्या,नळ,लाईटची बटणे .रिमोट इत्यादी.लिफ्टचा दरवाजा ऊघडतांना.कॅब,रिक्षा,कारने,बसने प्रवास करण्यापुर्वी अाणि केल्यानंतर न विसरता हँडसॅनिटायझर वापरणे.मला माहित अाहे लॉकडाऊनमुळे सगळं बंद अाहे पण या सवयी अापल्याला भविष्यातही कायम जोपासाव्या लागतील.सध्या सगळे अन्न शिजवुनच खावे.कच्चं काही खाणे टाळावे.घरी मोड अालेली कडधान्ये चालतील.याशिवाय गरम पाणी,चहा,सुप्स तसेच हळद,सुंठ पावडर,अाले,लसुण, मध,तुळशीचे पाने,दालचीनी,लवंग या सगळ्याचा वापर जमेल तितका अाणि तसा करावा.वर्तमानपत्राबाबतही मतमतांतरे अाहेत पण तोही काही दिवस टाळला तर ऊत्तम.अाजवर शेजाय्रांशी सलोखा असला तरीही एकमेकांकडे जाणे.दारात ऊभे राहुन गप्पा मारणे हे टाळावे व्यक्तिसंपर्क टाळता येईल तेवढा टाळावा.नोटा हे एक मोठे साधन अाहे विषाणु पसरविण्याचे.नोटा देणे घेणे टाळावे.पेटीएम,गुगल पे,अॅमॅझाॅन पे वापरावीत.नोटा द्यायची वेळ अालीच तर चेंज घेणे टाळावे.तेही टाळता अालं नाही तर परत अालेल्या नोटा 24 तास हात लागणार नाही अशा ठीकाणी ठेवुन द्याव्यात नंतरच वापराव्यात.हे सगळं झाल्यावर वीस सेकंद हात धुवावेत.अजुन एक सांगायचं राहिलं दरवाज्याचे नॉब.लिफ्टची बटणे.सार्वजनीक ठिकाणी डाव्या हाताचा वापर करावा.ATM मधुन एकदाच पैसे काढुन घरात ठेवावेत.वारंवार घराबाहेर पडणे टाळावे.अापल्या घराव्यतिरिक्त सुरक्षित स्थान दुसरे कुठलेच नाही.घरांत रहा,सुरक्षित रहा.या माहितीत काही चुका,त्रुटी असतील तर मोकळेपणाने सांगाव्यात.तुर्तास इतकंच!🔒🔒


Comments