लाॉक डाऊन डायरीज----नववा दिवस

🔒🔒🔒लाॉक डाऊन डायरीज.2.4.2020🔒🔒🔒नववा दिवस.🔒🔒



जय श्रीराम.अाज रामनवमी.खरं तर मोठ्या ऊत्साहात देशभर साजरा होणारा हा दिवस.पण माणसांबरोबर देवही कुलपात जाऊन बसले अाणि मोजक्या भक्तमंडळींसोबत अयोध्येतही रामनवमी साजरी झाली.अाज या जगतावरचं संकटंच खुप मोठ्ठं अाहे.अशीच काहीशी परिस्थिती रामजन्मापूर्वि होती.रावण नावाच्या राक्षसाने  सगळी पृथ्वी पादाक्रांत करुन देवलोकांकडे मोर्चा वळवला होता.भयभीत होऊन सगळे देव --देवाधिदेव विष्णुंकडे अाले यावर काहीतरी ऊपाययोजना करा.यावर विष्णुंनी मी स्वत:च अवतार धारण करुन जन्म घेणार असल्याचे सांगीतले .तोच हा दिवस रामनवमी...अाणि रावणरुपी राक्षसाला मारुन टाकण्यासाठी प्रभु श्रीराम.अाज बघीतलं तर हा विषाणुरुपी राक्षस सर्वत्र धुमाकुळ घालतो अाहे.अमेरिकेसारख्या मोठ्या देशाने पण यावर गुडघे टेकलेत.पण अजुनही ऊपाय सापडत नाहीये.भारतातही सगळे चिंतेत सापडले अाहेत.प्रत्येक जण वैयक्तिक पातळीवर काहीना काही ऊपासना करत अाहेत.जप,पुजाअर्चा,अनुष्ठानं,पोथीवाचन इत्यादी.या निमित्ताने का होईना अाध्यात्मिकता वाढीस लागली अाहे.दासबोधातही रामदास स्वामिंनी हेच सांगीतलंय राम बाहेर शोधु नका ,तो तुमच्या ह्रदयात अाधीपासुनच अाहे .त्या अात्मारामाचा शोध घ्या.स्वत:च्या अंतरंगात डोकावुन पहा.लॉकडाऊनच्या अाधीची अापली मन:स्थिती अाठवुन पहा.किती बाहेरच्या जगात रममाण होतो अापण सारे.सगळी अाकर्षेणे ,इच्छा ती पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी धडपड.माणसांची इच्छापूर्ती कधीच होऊ शकत नाही.एक इच्छा पूर्ण झाली की पुढे दहा इच्छा तुमच्यासमोर रांगेत ऊभ्या असतात.या लॉकडाऊन पिरिएडमध्ये प्रत्येकाला कमीतकमी गरजा ठेवुन कसं जगायचं याची जाणीव झालीय.इंग्रजीत याला 'मिनिमिस्टिक'जगणं म्हणतात.कदाचित या घटनेनंतर तुमचा जगण्याचा,अायुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलुन जाईल.अाज या घटनेने अापण अंतरबाह्य बदलुन गेलेलो असु.असं म्हणतात जे घडतंय त्याचा स्विकार करण्यासाठी .अापले बाह्यचक्षु अात वळवुन ,अंतचक्षुने अंतरातल्या अात्मारामाकडे वळण्यासाठी 'त्याने' दीलेली संधी नव्हे तर सुसंधीच म्हणावी लागेल.अशी सकारात्मकता ठेवल्यास दैनंदिन अडचणी शुल्लक वाटु लागतील.अाज ना ऊद्या या रावणरुपी राक्षसाचा अंत होणारच अाहे.जगभरात यावर संशोधन चालु अाहे.कुठेना कुठे 'राम' नावाची लस तयार करणे चालुच अाहे.पुढच्या वर्षि अयोध्येतल्या नूतन देवालयात 'रामनवमी' साजरी होईल अशी त्या रामचरणी प्रार्थना.🌹🌹🔒🔒




Comments