लॉक डाऊन डायरीज सोळावा दिवस.

🔒🔒🔒लॉक डाऊन डायरीज  सोळावा दिवस.9.4.2020🔒🔒




लॉक डाऊन  ........एक भाकड दिवस..........काल हनुमान जयंती.सकाळपासुनच खुप काही डोक्यात घोळत होतं.शब्दांची.माहितीची जमवाजमव चालु होती. रात्री झोपेपर्यंत लिहु असा विचारही केला.पण विचारांचे विसविशीत ढग काही एकत्र अाले नाहीत.शरीराबरोबरच शब्दांनीही माना टाकल्या अाणि कालचा दिवस रीताच गेला.सगळेच दिवस कुठे असतात बहराचे.काही शिशिराचे....पानगळीचेही असतातच ना!निष्पर्ण ,ऊघड्या बोडक्या ऊंच अशा झाडाच्या टोकावर अाशेची कोवळी लालसर पोपटी पालवी फुटतेच ना!त्यासाठी काळोखाच्या गर्भातुन येणाय्रा ऊष:कालाची वाट पहावी लागते.तसंच काहीसं मनांत विचार येणं,सुचणं,त्याची सुसंगती लावणं.त्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करणं.मनांतले विचार ,सुचलेलं पुन्हां मनातच पडताळून पाहणं अाणि ते योग्यपणे मांडणं.ही एक प्रक्रीया अाहे.घेतलं पेन अाणि लिहिलं सपासप.किंवा अाज घेतला मोबाईल टाईपले शब्द असं होत नाही.लिहीलेलं स्वत:ला पटलं,अावडलं तरच ते इतरांनाही अावडु शकतं.अावडेलच असं नाही.मतभिन्नता असु शकते.स्वांतसुखाय असं लेखन  असावंच.मनाशी ,विचारांशी प्रामाणिक असणं.अापलं लेखन हे अारशासारखं असावं .अापलीच प्रतिमा लख्ख दिसावी.लिहीण्यात पण असतातच काही भाकड ,मनाजोगे न जमलेले काही दिवस.कधी एखादा शब्द अडतो तर कधी विचार अडतात.सगळं मनाजोगतं जमुन यायला असावं लागतं संगतवार .असो.सगळीचं दानं मनाजोगती पडत नाहीत.काही फासे ऊलटे पालटे पडतांत.सध्या सगळ्या जगाचे फासे ऊलटे पडलेत.देव करो नी पुन्हां सगळं सुरळीत होवो.माझ्या लिखाणाचे दिवस भाकड गेले तरी चालतील.पण अवघ्या मानवसृष्टीवर पुन्हां 'हिरव्या कोंबाचे' ,बहराचे दिवस येवोत.🔒🔒शिशिरातुन ...बहराक एक अाशा.🔒🔒 सौ.पुर्वा लाटकर.🔒🔒

Comments