'सोशल डिस्टन्स' खरंतर माणूस हा समाजप्रेमी .फार पूर्विपासुन एकएकटाच राहायचा.शेती करायला सुरवात केली अाणि तो घोळक्याने राहु लागला.कुटुंबव्यवस्था तयार झाली .माणसाची ऊत्क्रांती झाली अनेक शोध लागले .प्रगतीच्या दिशेने पावले टाकत तो पुढे जसा जसा जाऊ लागला तसतसे वैचारिक,सामाजिक,अार्थिकदृष्टिने स्वतंत्र होऊ लागला.
2000 सालापासुन .कॉंप्युटरची क्रांती झाली .घरोघरची मुले परदेशी शिक्षण घेऊ लागली.तिथेच नोकय्रा करु लागली.बापाने अायुष्यभर कमावला नाही एवढी कमाई एका महिन्याची येऊ लागली.अाणि कुठेतरी इथेच सोशल डिस्टसिंगला सुरवात झाली.मी.माझं कुटुंब ,मुले एवढ्याच परिघात इतिकर्तव्यता वाटु लागली.यात अाजी अाजोबा परिघा बाहेर फेकले गेले.वृद्धाश्रमांची संख्या वाढु लागली.अाय.टी.बुम मुळे दोघेही कमावते झाले.गरजा भागवुन चैनिसाठी बक्कळ पैका ऊरु लागला.माणसा माणसांतील नात्यांमधील दय्रा वाढु लागल्या.बेफिकीरपणा अंगी रुजला.'मला काय त्याचे ' ,माझ्याशी काय संबंध? 'अशी वृत्ती जोपासली गेली.अाताशा सगळेच जण एखाद्या लग्नसमारंभात.मुंजीत,वाढदिवसाला भेटतो.'हाय हॅलो म्हणत हात मिळवले जातात.ओठांचे कोन समोरच्या व्यक्तिच्या जवळीकीनुसार लहान मोठे होतात.बय्राच वर्षांनी भेटल्याने एकमेकांच्या चौकशीची सलामी झडते.अापअापसांत कुजबुज,टीका टिप्पणी होते.वाढलेल्या वयाचे फरक नजरेनेच जोखले जातात.अक्षता पडतात.अाणि मंडळी जेवण्याच्या टेबलकडे धाव घेतात.जेवण झाल्यावर पार्श्वभागाला हात पुसत.बिझी असल्याचे भासवत सगळेजण पांगतात.व्हॉटसअपनंबर घेतले जातात .कधीही मेसेज न टाकण्यासाठी.मंडळी खरंच सांगा अशी मनामनाने विभक्त झालेली नाती.दुरावा.असतांना अाज अापण 'सोशल डिस्टंसिंगला' का घाबरतोय? अापण तर केंव्हांच डिस्टन्स राखुन वागतोय.मोदीजींच्या या घोषणेने अाता फिजिकल डिस्टन्स राखायचंय.कोण जाणे या घातक विषाणुमुळे मनामनांतले विष कमी होऊन पुन्हा एकदा सगळं जग खय्रा अर्थाने 'वसुधैव कुटुंबकम' बनेल.अाशावादी राहुया.वाईटातुनही चांगलं ऊपजेल याची अाशा करुया.अजुन काही दिवस 'सोशल डिस्टंन्सिंग पाळुया.!!
🔒🔒लॉक डाऊन असलं तरी मनाने मुक्त विचार करणारी.

खूपच छान आहे पूर्वा!
ReplyDelete