लॉकडाऊन डायरीज17 मे 2020

🔒🔒🔒

लॉकडाऊन डायरीज17 मे 2020🔒🔒
सध्या सगळ्यांच्या फोर व्हिलर,टु व्हीलर गाड्या पार्किंगमध्ये अाणि साड्या.....सॉरी कुडते,लेगींग्ज ,जीन्स टॉप,शर्टस,फॉर्मल्स वॉर्डरोबध्ये तर शुज ,सॅंडल्स, चपल्स शु रॅकमध्ये विसावलेले अाहेत.सध्या इडीयटबॉक्स पण फारसा कामाचा  नाहीये.फक्त एकुलती एकच गोष्ट अापल्या हातातली,जवळची अाणि गरजेची सुद्धा बनली अाहे ती म्हणजे अापला स्मार्टफोन.सध्या माहिती देणारा,मनोरंजन करणारा,अापली कामे करणारा ऊदा.मनीट्रन्सफर,लाईटबील,मोबाईल बील,फोनबील,बँकेचं लोन ,अार.डी.,गॅसचे पैसे ,औषधे मागवणारा. भाजी मागवणारा! पीठे,दळणं मागवणारा,एखाद्याचा वाढदिवस असेल तर परस्पर केक,बुके पाठवणारा.एरव्ही खरेदीसाठी ऊत्तम पर्याय असलेला.सध्या लॉकडाऊनच्या काळात सोनेही अॉनलाईन खरेदी करणारा.अॉनलाईन मद्यविक्रि पण हा या काळातला नवा पायंडा पडु पाहतोय.अापल्या जिभेचे लाड पुरवणारा हवा तो पदार्थ हव्या त्या वेळी काही मिनीटांत समोर हजर करणारा.देशांतील,परदेशातील सगळ्यांशी व्हॉटसअपद्वारे कनेक्ट करणारा हाच तो स्मार्ट फोन.लहानांपासुन मोठ्या वयाच्या मुलांना विविध गेम्सचे वेड लावणारा.गुगलद्वारे माहितीचा प्रचंड खजिना ऊघडणारा.युट्युबवर मनोरंजन तसेच तुमची इच्छा असलेली कला शिकवणारा हाच तो स्मार्ट फोन.फेसबुकमुळे अनेक सामाजिक समुदायाशी जोडले जाण्याचा एक पर्याय हा देतो.ट्वीटर,इन्स्टाग्राम मी वापरत नाही त्यामुळे त्याबद्दल बोलणार नाही.पण टेक्नोसॅव्ही नविन पिढीसाठी पण हे अॅप अाहेतच.गुगलमॅपद्वारे जगात कुठेही गेलात तर रस्ता,पत्ता दाखविणारा हाच सोबती असतो.ट्रॅफिक जाम कुठे अाहे?कोणते रस्ते मोकळे अाहेत? हे सांगणारा.हवामानाची, तापमानाची ,पाऊस पाण्याची माहिती हाच देतो.

या स्मार्टफोनने देवांनाही वगळलं नाहीये.घरबसल्या अॉनलाईन दर्शन,अारती,प्रसाद.मुखदर्शन .तेथे जाण्यासाठी लागणारा पास,व्हिअायपी दर्शन हा देतो.गणपतीच्या दिवसांत गुरुजींची कमतरता भासल्याने हा पुजा सांगतो.
शेतकय्रानांहि हा वरदान ठरलाय अॉनलाईन भाजी,फळे विक्रि.पेरणी कशी,कधी करायची,कोणती खते घालायची?पिकावरच्या किडीवर कोणतं औषध फवारायचं?कोणती खतं घालायची?पाण्याचं व्यवस्थापन ,नियोजन कसं करायचं? हे सगळं हाच करतो.
मुलांना अभ्यासासाठी,माहितीसाठी,अनेक प्रकल्पांसाठी हाच ऊपयोगी ठरतो.
'अारोग्यसेतु अॅप'हा सध्या करोनाची माहिती,अपडेटस देतोय.अापल्याला अलर्ट करतोय
असा हा सध्या क्षणभरही दूर जात नाही .पण या पासुन थोडं दूर रहायचं असेल तर 'मोबाईल पार्किंग 'ही नवी संकल्पना मी वाचली.काय अाहे हे मोबाईल पार्कींग?तर सतत अापल्या जवळ असलेल्या ,हातात असलेल्या!अापला वेळ खाणारा,घालवणारा या 'अतीहुशार'फोनने वेड लावलंय.सवय लावलिय,कोणाचं तर व्यसनांत रुपांतर झालंय.हे टाळण्यासाठी 'मोबाईल पार्क' करायचा.अगदी गाडी पार्क करतो नां.अगदी तसंच.गाडी जशी अापल्याला हवी तेंव्हांच बाहेर काढतो त्याचप्रमाणे याला पण घरांत ठराविक ठिकाणी पार्क करायचं....म्हणजे ठेवुन द्यायचं.'जेथे जातो तेथे तु माझां सांगाती.चालवीशी हाती धरोनिया' असं न करता,याला थोडं मागे ठेवुन,दुर्लक्ष करुन.ठेवून द्यावं .बसं बापडा.माझी कामं मला करु देत.मगच मी हातात घेईन तुल.सतत घुटमळु नकोस,अडथळा अाणु नकोस अशी सक्त ताकीदच द्यावी त्याला.ठराविक वेळाच ठरवाव्यात याच्यासाठी.अापला 'स्मार्ट फोन' अापल्यापेक्षा हुशार,वरचढ ठरु नये.'पायीची वहाण पायीच बरी'या ऊक्तीनुसार याला याची' जागा' दाखविण्याची वेळ अाली अाहे.काय पटतंय ना!मग कोठे करतांय तुमचा 'मोबाईल पार्क?'
🔒🔒🔒सौ.पुर्वा लाटकर,पुणे.🔒🔒


Comments