एक स्वतंत्र बेट

🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝



हल्ली प्रत्येक माणूसच झालाय एक स्वतंत्र बेट.
चहूबाजुनी पाण्याने वेढलेलं ,तरीही तहानलेलं.
भावनाशून्य ओलावाच सगळीकडे,रखरखाट नुसतां चहुकडे.
एकटेपणांच सुख हवंहवंस वाटणारं
तितकंच एकटेपणाचं दु:ख बोचणारं.
कधी कधी बेटाला वाटतं तोडून टाकावेत पाश ,अन जावं दूर दुसय्रा बेटाकडे.
बघावा मिळतोय का थोडासा ओलावा
खोल मुळाशी शिल्लक राहिलेला.
पण मग मनांत भितीदेखील तीतकीच झिडकारण्याची,नाकारण्याची ,अवहेलनेची.
अाणि मग पुन्हां...त्याच एकटेपणाची.
त्यापेक्षा नकोच ते सगळं .नको असलेलं स्विकारण्याऐवजी,
एकटेपणाच बरा नव्हे का?
कोणाची नसली तरी सोबत स्वत:चीच स्वत:शी.अाणि एकटेपणाची.
असं म्हणत बेट राहतं अापलंच दु:ख गिळत.
....कारण हल्ली प्रत्येक माणूसच झालाय

एक स्वतंत्र बेट.
.......अाणि अाधीच एकाकी,एकटं असलेलं बेट राहातं अजूनही एकाकी.एकटं.अनंत काळापर्यंत.🏝🏝🏝
             सौ.पुर्वा लाटकर,पुणे.🏝🏝🏝

Comments