सहा जणींचे वाढदिवस

 हाय सख्यांनो!अाज फार दिवसांनी की वर्षांनी तुम्हां सगळ्यांना निवांतपणे भेटण्याचा योग अाला.अापल्या सहा सख्यांचे पन्नाशीचे वाढदिवस कोरोना,लॉकडाउनमुळे पेंडींग होते.मी दिवाळीसाठी इथे असल्याने मला येता अालं.सकाळपासुनच पोटांत अानंदाची फुलपाखरे ऊडत होती.गेले अाठ दहा महिने नवीन ड्रेस शिवलेले कपाटात पडुन होते.ते घालायचा योग अाला.एरवी अाठ महिने घरच्या 'अवतारातच' काढले.काकुंच्या फार्महाऊसवर सगळ्यांनी जोरदार,अानंदाने स्वागत केले.काही वेळातच गरमागरम खेकडा भजी अाली.त्याचा आस्वाद घेतला!स्प्राईट पिऊन सख्या थंडगार झाल्या!हळुहळू सगळ्या जमल्या गप्पा गोष्टी,विचारपुस चालु होती.सहा सख्यांंना ओवाळलं,साडी ,गजरा,नारळ देऊन ओटी भरली.केक कापले.दोन्ही केक छानच!स्वातीने सहा सख्यांबद्दल छान मिश्कीलशैलीत लिहीलेलं वाचलं,जयश्रीने पण त्याच पद्धतीने तीच्या भावना शब्दांत व्यक्त केल्या!जयंती पण छानच लिहीते !तीची कविता,तीच्या भावना तीने शब्दांत व्यक्त केल्या!जेवण सुग्रासच!काकुंचं वांग्याचं भरीत,पोळ्या,भाजी,लोणची,कालाजामुन,केक!सगळ्या मेनूवर सोलकढीने कडी केली.माधुरीची पुडाची वडी,पान लाडू अप्रतीम!जयश्रीची जिलबी खासच!सुरेखाने आणलेले सातारचे कंदी पेठे.या सगळ्याने जिव्हा आणि मन तृप्त झाले.संध्याकाळचा चहा घेऊन मैत्रिणी पांगल्या.

गेले अनेक महिने असलेलं मनावरचं मळभ दुर झालं.पुढची वाटचाल करायला बळ मिळालं!असा ग्रुप कुढेही होणे,मिळणे शक्य नाही.मी खुप मिस करते,पण तीथेही 'माणसं,मैत्रीणी' जोडण्याचा ऊद्योग चालू आहे.असो.मजा आली.😊😊

Comments