🌴🌴🌴

   ऊगवत्या सुर्याचा देश कोणता? 'जपान'.करेक्ट अाहे! माझ्या घराला मी               ' ऊगवत्या सुर्याचे 'घर असे म्हणते.कारण काय ?  अहो माझ्या बेडरुमच्या दारातुन,खिडकीतुन अाणि गॅलरीतुन ऊगवतीचे मस्त तांबुस,लालसर अाकाश दिसते.एखादं पोट्रेट पहावं तसं  संपूर्ण व्ह्यु दिसतो.

  ऊगवतीच्या अाधीचा अंधार!हळुहळु दृष्टीस पडणारी झाडे,रस्ते ,मावळत्या पण लखलखखीत तारका,थकलेला,मलुल,निस्तेज ,घराकडे परतण्याची घाई असलेला चंद्रमा.हे सगळं क्षणाक्षणाला बदलत जाऊन .क्षितिजाचे रंग बदलु लागतात,अाकाशात पक्षांचे थवे नव्या ऊमेदीने अाणि नव्या जोमाने झेपावतात.लाल,गुलाबी,केशरी रंगांची ऊधळण  निळ्या अाकाशाच्या कॅनव्हासवर रंगांची अजुनच खुलुन दिसते.मग क्षितीजकडा अजुनच प्रकाशीत दिसु लागतात.किंचित डोके वर काढुन सूर्यनारायण येत असल्याची वर्दी देतात.अगदी अलगद ,हळुवारपणाने सूर्य अाकाशात विराजमान होतो.सगळी सृष्टी,अाकाश त्या तेजाने न्हाऊन निघते.प्रकाशाच्या रेघा सरळ माझ्या अंथरुणावर येऊन मला गुदगुल्या करतात.चल ऊठ असे म्हणत मला ऊठवतात.थंडीत हा ऊबदार स्पर्श हवाहवासा वाटतो.अजुन थोडावेळ गुरगटुन झोपायची सवलत देतो.नाही ऊठले तर रागाने अापली तीव्र किरणे मला ऊठायला भाग पाडतात.

ऊन्हाळ्यात तर कितीही पडदे सरकवले,दार बंद ठेवलं तरी त्याची धग माझ्यापर्यंत पोहोचतेच.मग सकाळपासुनच घामाच्या धारांनी अांघोळ होते.

पावसाळ्यात कधी ऊन पावसाच्या खेळाला अजुनच ऊधाण येतं.सुर्य ऊगवला नाहीतरी त्याचं अस्तित्व जाणवतंच! जोरदार,धुमशान पावसाची ,पागोळ्यांची ,भिजत्या झाडाची ,थरथरत अाडोशाला बसलेल्या पाखरांची लयलुट दिसतेच.

मग कशी वाटली ही सफर माझ्या 'ऊगवत्या सूर्याच्या घराची'?🌴🌴

      🌴🌴          सौ.पूर्वा लाटकर  ,अलिबाग.निसर्गवेडी ऊगवतीची 'पूर्वाई'🌴🌴

Comments