🎉🎉🎊🎊🎈

 प्रिय भारतीस ......अाज तुझा पन्नासावा वाढदिवस.अापल्या प्रत्येकीच्याच अायुष्यात अालेला हा दिवस अगदी खासमखासच असतो.प्रत्येकजण अापअापल्या भावनेने हा वाढदिवस साजरा करतो.घरच्यांचा ऊत्साहही अगदी ओसंडुन वाहात असतो.अाजवरच्या कष्टाची परिपुर्ती,सिंहावलोकन असं बरंचसं काही मनांत असतं.

तु पण अाजवर कुटुंबासाठी खुप काही केलंय.सगळ्या सासर माहेरच्या कठीण काळात तुझी होणारी अलिबाग —वसईची धावपळ अाम्ही बघीतली अाहे.सगळं निभावतांना अगदी तारेवरची कसरतही झालीय.दोन्ही घरांना बॅलन्स ठेवतांना स्वत:कडे दुर्लक्षही झालंय.यश अपयश ,चढ ऊतार हे चालुच होतं.

अशा परिस्थितीतुनच अाज लेकाने जे यश मिळवलंय ते बघतांना साय्रा कष्टाचं चीज झालंय असं वाटतंय.अाज करोनाच्या संकटातही तो एकटा स्वत:ला सावरतोय ,काळजी घेतोय,तसेच लांबुन का होईना तुमच्याशी 'कनेक्टेड' अाहे ,हे ही नसे थोडके.

 'मैफिल'अलिबागच्या प्रत्येक कार्यक्रमाची तु पडद्याअाडची कलाकार अाहे.येणाय्रा कलाकारांचे स्वागत,त्यांची व्यवस्था,चहा,नाष्टा,जेवण सगळ्याची घेतलेली जबाबदारी,प्रत्येकाचे मुड,त्यांचा,अाब,मोठेपणा,प्रसिद्धी सांभाळत ,त्यांच्याशी जुळवुन घेत .कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणं....हे सगळं तु अगदी हसतमुखाने केलंस.श्री.वझे बाहेरची 'मैफील'सांभाळत असतांना तु मात्र घरातली अाणि 'मैफीलीमागची मैफील' सांभाळत सगळे सुर सुरेल कसे लागतील याची काळजी घेतलीस.घराचा सुर कधी कणसुर लागु नये म्हणुन प्रयत्न केलेस.

अाज तुझ्या या पन्नासाव्या वाढदिवशी अनेक अनेक शुभेच्छा.तुझी सगळी स्वप्ने पुर्ण होवोत.तुझ्या अायुष्याची 'मैफिल'कायम रंगत राहो.खुप खुप शुभेच्छा!🎉🎊🎉🎈 

               सौ.पुर्वा लाटकर🌴🌴

Comments