एके सकाळी गॅलरीतल्या वृंदेवर

कुठुनसे आले चिमुकले फुलपाखरू 


 भिर भिर भिरभिरले अन् 

 अलगद विसावले मंजिऱ्यांवर



 पंख नाजूक शाम श्वेत शेंदरी 

त्यावर थेंबाची सुंदर नक्षी 

 

गेली माझी नजर तयावर 

गारूड घातले मनावर


निसर्गाचा हा सुंदर आविष्कार 

 केला बंदिस्त कॅमेऱ्यावर 





सौ.पूर्वा लाटकर 

  फोटो आणि कविता

Comments