डोडवाड काकुंच्या पंचाहत्तरी निमित्त लेख लिहिला होता!आणि आज अचानकच ध्यानीमनी नसतांनाही सकाळीच दु:खद बातमी समजली.काल पर्यंत छान बोलणाय्रा,मेसेज टाकणाय्रा काकु आपल्यात नाहीत हे मनांला पटतंच नाहीये.

आपल्या ग्रुपमध्ये आल्या तेंव्हापासुन त्यांच्या सहवासाची,सोबतीची अनेक  चित्रे ,प्रसंग डोळ्यासमोर ऊभी राहतात.

 टिपीकल साऊथ इंडियन,कानडी लुक!त्यांच्या त्या खास बॉर्डरच्या साड्या,पांढय्रा खड्यांच्या कानातल्या कुड्या सगळं खुप छान वाटायचं!

हळुहळु त्या ग्रुपमध्ये रमल्या,वाचनाचं.....तेही मराठी वाचनाचं वेड होतं त्यांना !गाण्याची आवड,कानडी भजन ,गाणी म्हणतांना त्या रंगुन जात!अगदी काही दिवसांपुर्वी झालेल्या सहा जणींच्या वाढदिवसाला पण त्यांनी आशिर्वादपर  गाणे म्हंटले.

सतत ऊत्साही,हसतमुख!समोरच्याची अडचण ओळखुन मदतीची तयारी!खायला प्यायला घालायची तत्परता ,ओढ !त्यांच्या हातचा बिसिबेळे भात,रस्सम वडा,इडली ,काॅफी आणि इतर बरेच पदार्थ कायमच जिभेवर आणि मनांत रेंगाळत राहतील.

वय शरीराला असतं मनांला नाही.मनाने ताजं ,टवटवीत,तरुण ,ऊत्साही राहुन कसं जगायचं हे त्यांच्याकडुन शिकण्यासारखं आहे. प्रत्येक भिशीला,आवर्तनाला,वाढदिवसाला ,येणाय्रा गणेश जयंतीला त्यांची आठवण येत राहणार.

   आपण मात्र ग्रुपमधल्या एका जेष्ठ व्यक्तिच्या आशिर्वादाला कायमचं मुकलो आहोत!ही हानी,नुकसान भरुन न निघण्यासारखं आहे.

काकु 'We All Miss You Forever'.



        सौ.पुर्वा लाटकर,पुणे   (21.1 .2021)

Comments