🎍🎍🎍🎍🎍🎍

      बागेतला एक कोपरा खास राखीव होता.तो कोपरा पटकन लक्ष वेधुन घ्यायचा.इथे विविध प्रकारची शोभिवंत झाडे लावली होती.ती शोभिवंत झाडे लहान मोठ्या आकाराच्या ,रंगांच्या कुंड्यांमध्ये आकर्षक पद्धतिने सजवली होती.छान कापून,छाटून त्यांना आकार दिला होता.केवढी विविधता होती त्यांच्यात!लाल,पिवळसर,पांढरट,हिरवी,चाॅकलेटी रंगांची पाने.ठिपकेदार,झुपकेदार,नक्षीदार पाने.सगळी झाडे छान टवटवीत.खास लक्ष देऊन जोपासना केलेली.झाडाच्या तळाशी,कुंडीत ,पांढय्रा गारगोट्या,रंगीबेरंगी दगडांची सजावट.ही झाडे कायम टवटवीत.घरात,हॉस्पिटलमध्ये,सगळीकडे यांचा वापर सुशोभिकरणासाठी केला जातो.

    ही झाडे रोपे बघुन मला कोणाची आठवण झाली असेल तर ते आपले सेलिब्रेटी.समाजात कायम लक्ष वेधून घेणारे.चकाकत रहाणारे.छान छान दिसणारे.स्वत:च्या इमेजला जपणारे.ब्युटीट्रिटमेंट,ब्रँडेड कपडे ,आलीशान गाड्या वापरणारे.सतत हसतमुख असल्याचा आव आणणारे.चाहत्यांच्या गराड्यात रमणारे.समाजात एक स्वत:चा असा ठसा ऊमटविणारे.

      समाजासाठी काही प्रमाणात मदत करणारे.पण जास्त भर शोकडेच!

 अशीच ही झाडे सेलिब्रेटींसारखी,इतरांपासुन लांब.नुसत्या सजावटीसाठी वापरली जाणारी.ही झाडे आणि सेलिब्रेटींचा चकचकाट ,झगमगाट यांच्यापासुन दुरुन बघणे एवढेच हातात आहे.हे दोघेही जमिनीवर रुजुन,राहुनही हवेत असल्यासारखी वागतात.यांची हवा निराळीच!यांना दुरुनच नमस्कार करणे बरे.🎍🎍🎍

       सौ.पुर्वा लाटकर.(  11.2.2021).

Comments