' नातं ..............' त्याच्याबरोबर' " -सौ.पूर्वा लाटकर.                    .    .....काल मी नात्यांबद्दल आणि त्यांच्या स्भावधर्माबद्दल बोलले.पण एक नातं असंही आहे की ज्याच्याशी तुम्ही कायम जोडलेले असलं पाहीजे.त्या नात्याशी सख्यत्व कसं वाढेल हे पहायला हवं .त्या नात्याशी अनुसंधान बांधून ते कसं ' update आणि  upgrade होईल याच्याकडे बघायला हवं .ते नातं म्हणजे भगवंताचं .ते नातं म्हणजे परमेश्वर.ते नातं म्हणजे तुमची ज्या कशावर श्रध्दा आहे अशा मुर्तिवर.किंवा तुमच्या कुलदेवतेवर.अगदीच काही नाही तर एक अशी अलौकिक शक्ति.किंवा अगदी निसर्गालासुध्दा मानलं तरी चालेल.मग अशा नात्याला फुलवायला काय करायला हवं तर त नवविधाभक्तिमधील एखादी भक्ती .वंदन,अर्चना ,किर्तन,पाद्यपुजा दास्य भक्ति पण या साय्रा भक्तिंपेक्षा श्रेष्ठ ठरते ते भक्ति म्हणजे नामस्मरण.कोणत्याही साधना शिवाय.कोणत्याही ऊपचाराशिवाय.कोठेही, कधीही केंव्हाही करता येण्यासारखी भक्ती.हा एक सहज सोपा shortcut आहे असं म्हणाना देवाशी अनुसंघान बांघण्याचा.त्याच्याशी मैत्री वाढवायचा.सख्यत्व वाढवायचा.

Comments