*अलक*

      संध्याकाळच्या वेळी ,भरगच्च माणसांच्या गर्दित ऊभी राहुन तीचा  जीव घुसमटला,त्यात ट्रॅफीक जॅमच्या नित्याच्या भल्या मोठ्या रांगा,धूर,धुळ ,वाहनांचे कर्णकर्कश्श आवाज ऐकुन तीच्या वैतागात भरच पडत होती.घरी जाऊन पुन्हा पदर खोचुन ऊभे राहावे लागणार होतेच.जीवाची नुसती घालमेल.इतक्यात रस्त्याच्या  कडेला लावलेल्या फुलझाडांमधुन पिवळे जर्द फुलपाखरु  स्वैरपणे भिरभिरतांना पाहिले अन तीला किंचीतसा सूकुन  मिळाला.

      सौ. पुर्वा लाटकर

Comments