*अलक* 

 तीचा रोजचा मॉर्निंग वॉकचा रस्ता.आजुबाजुला असंख्य निर्माणाधिन इमारती.त्यात राबणारे असंख्य,कष्टकरी कामगारांचे हात.त्यात त्यांचे कुटुंबही . फुटपाथवर बांधलेल्या झोळीत पोर.त्याला सांभाळणारी ७,८ वर्षांची चुणचुणीत ,सावळी,हसरी पोर.तीच्या चेहय्रावरचे निर्व्याज्य हसु पाहुन तीला आपली त्याच वयाची रुसलेली ,रागावलेली ,मुलगी आठवली आणि मनांत खिन्नता आली.

   *सौ.पुर्वा लाटकर*

Comments