महीला दिन

 *महिला दिन विशेष अलक*

नेमेची येतो ....' तद्वत ,जागतिक महिला दिन येऊन ठेपला .आणि विविध मार्गांनी तीला लुभावण्याचे प्रयत्न सुरु झाले.ऊदा.चित्रपटगृहात तिन्ही शो विनामुल्य,ब्युटीपार्लरची सुविधा निम्म्या किंमतीत,पिझ्झा डिलिव्हरिवर अमुक पर्सेंटची सुट,कॅफे रेस्टॉरंटमध्ये बीलावर सवलत किंवा छोटंसं गिफ्ट,एका साडीवर अजुन एक साडी फ्री.हेल्थ चेकअपवर काही प्रमाणात सुट.हे सगळं केवळ व्यापारी दृष्टीकोनातुन वापरलेले फंडे आहेत.स्वत:ची जाहिरातबाजी,नफा कमावण्यासाठी स्रियांना समोर ठेऊन केलेली क्लृप्ती आहे.स्रीयाही याला बळी पडतात.या सगळ्याला भुलतात.'महिला दिन' असाच साजरा करायचा असतो असं वाटु लागतं त्यांना.

  काही राजकारणी तर महिलांना कोल्हापुरची अंबाबाई,शिर्डी,तुळजापुरची भवानी इत्यादी ठीकाणी धार्मिक सहली काढतात.स्वत:ची पोळी भाजुन घेतात.

  यात स्रियांच्या समस्यांकडे साफ दुर्लक्ष होतं.त्यांचे मुळातले प्रश्न काय आहेत याचा खोलवर विचारच कोणी करत नाही.त्यांच्यावरचे अन्याय,अत्याचार,शोषण,कुपोषण,अपमान,अवहेलना,दुय्यम वागणूक.न्याय न मिळणं,त्यांची बाजु न मांडता येणं ,प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागणं.या मुद्यांकडे कोणाचं लक्षच जात नाही.

  शिक्षणात अडथळे,नोकरीत मुस्कटदाबी,तिच्यावर सातत्याने टीका.तीच्या अनेक मागण्यांकडे कानाडोळा करणं सगळ्याच ठिकाणी चालु आहे.

  नाही म्हणायला आज अनेक संस्था स्रियांसाठी काम करत आहेत.पण कुठेतरी त्या अपुय्रा पडत आहेत.

      'महिला दिन 'येईल जाईल पण महिलांना हे वरवरचं सेलिब्रेशन नकोय.वर्षभर त्यांना मानाने,सन्मानाने,माणूसकीने वागवा.तीच्या परिश्रमाला थोडासा हातभार लावा.तीच्या जाणीवा तुमच्यातही ऊतरु द्यात.तिच्यासारखंच तुम्हीही थोडंस मृदु,मातृह्रदयी व्हा!


       सौ.पुर्वा लाटकर

Comments