2)   आज तु करशील रे कौतुक माझं!आजचा दिवस फक्त बायकोचे लाड करायचा !मला महागडे गिफ्टसही आणशील.डीनरला बाहेर घेऊन जाशील ,माझ्या आवडीचं आईस्क्रिमही मनसोक्त खाऊ घालशील.शेवटी लॉंगड्राईव्हलाही नेशील. पण मला काय हवंय ते कधी कळेल तुला?घरातल्या लहानसहान कामात मदत,कधी दमल्यावर वाफाळत्या चहाचा कप,राबुन केलेल्या पदार्थांचं कौतुक,स्वत:च्या वस्तु जागेवर ठेवणे.मी जशी तुझ्याबरोबरीने  आय .टी सेक्टरमध्ये काम करते.मलाही प्रोजेक्टस असतात,डेडलाईन्स असतात,वर्क प्रेशर असतं.वेळेचं गणीत जुळवता जुळवता मी पण थकते,कंटाळते .एवढी जाणीव ठेवुन जरी वागलास ना तरीही पुरेसं आहे.वुमन्स डे ला वेगळं काही करण्याची गरजच ऊरणार नाही.

Comments