4)ती लढतेच आले गेली अनेक दशकं!स्वत:च्या हक्कासाठी,स्वत:च्या अस्तित्वासाठी !हे अर्धे काळे मळभ मिटविण्याचा ती निकराने प्रयत्न करतेय.हे अर्धे जग आहे अत्याचार सहन करणाय्रा स्रियांचं,बलात्कार पिडीतांचं,गर्भातच खुडुन टाकणाय्रा कलिकांचं,थोड्या पैशांसाठी तीची विक्री करणाय्रा तीच्या सारख्या अनेकींचं,तीचं शोषण करणाय्रांचं.जन्मत:च तीचं नकोशी म्हणुन टाकणाय्राचं.पदोपदी अपमान,तीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तीच्यावर अत्याचार करणारं तीच्या वाटेवर काचा टाकणारं जग!तीला प्रगतीपासुन ,पुढे जाण्यापासुन रोखणारं जग.अाज सगळीकडे सत्कार,समारंभ,सोहळा चालु आहे.या दिव्यांच्या लखलखाटात ,झगमगाटात 'हे' अर्धं जग कोणाच्या नजरेसमोर येतंच नाही.कोणाचे लक्षंच जात नाही.तीचं अर्धे आभाळ ,त्यावरचं मळभ ती निकराने पुसतेय,तीला हवाय मदतीचा हात!द्याल तुम्ही!

Comments