3)महिला दिना निमित्त आज विविध क्षेत्रातल्या मान्यवर महिलांचा सत्कार होत होता.खेळाडु,संगीतकार,शास्रज्ञ,लेखिका,बस ड्रायव्हर ,ऊद्योजिका,समाज सेविका,डॉक्टर,सरपंच,पोस्टवुमन,गॅरेज चालविणाय्रा,पेट्रोलपंप चालविणाय्रा.समाजातील विविध थरातील या महिला 'ती' चं जग बदलविण्याचं काम करत होत्या.एक एक महिला येऊन हसतमुखाने पुरस्कार स्विकारत होती.कौतुकाचे,गौरवपर शब्द!भाषणे,टाळ्यांचा कडकडाट ,मान मरातब.समारंभ संपताच महिला घरी परतत होत्या. परततांना प्रत्येकीच्या मनांत एकच सवाल ऊमटत होता.आजचा दिवस संपला.एक दिवसाचा सोहळा.पुढच्या तीनशे चौसष्ट दिवसाचं काय?

Comments