6)'बाई गं तुझं चुकलंच!' हो !तुझं चुकलंच!जरा नाही तर अक्षम्य अशी चुक झालीय तुझ्या हातुन.त्याच्याशी बरोबरी करता करता नको त्या वाटेवर गेलीस.सिगारेटच्या धुक्यात हरवुन गेलीस.मद्याच्या नशेत झिंगु लागलीस. ड्रग्जच्या विळख्यात अडकलीस.अवैध मार्गाने पैसा मिळवु लागलीस.गुन्ह्यांमध्ये मदत करु लागलीस.चोय्रा,दरोडे टाकु लागलीस.स्रियांनाच वाईट मार्गाला लावु लागलीस .स्वत:च्या घराकडे पाठ फिरवु लागलीस.आवर स्वत:ला वेळीच,तुझी निरागस ,लहान मुलं हे सगळं बघत आहेत. ऊद्या ते तुझंच अनुकरण करतील.नकळत तुझं कुटुंबही यात भरडलं जातंय.मॉर्डन म्हणवुन घेत नको त्या मार्गाला गेलीस.मागे फीर.तु एक स्री आहेस,आई आहेस. घराचा कणा आहेस.तो असा मोडु नकोस.

Comments