*जागतिक महिला दिनानिमित्त लिहीलेल काही अलक*


     टाळ्यांच्या कडकडाटाने ती भानावर आली.डोळ्यांसमोर अश्रुंचा पारदर्शक पडदा तयार झाला होता.अश्रु कसले ,आनंदाचे कि दु:खाचे ?तीचं तीलाच कळेनासं झालं होतं.गेली कैक वर्षे ती हेच तर कार्य करत आली होती.महिलांना सावरण्याचं,बळ देण्याचं.तीचा आश्रम हाच निराधार स्रियांना आसराच बनला होता.अनेक हालअपेष्टा,आर्थिक अडचणी,सरकार दरबारी खेटे .सगळ्या मानअपमानातुन ती गेली होती.कोणी साधी विचचरपुसही केली नाही की मदतीचा हातही दीला नाही!आणि हा आजचा सत्कार सोहळा!कशासाठी?कोणासाठी?मी माझं कार्य पुढेही चालुच ठेवणार आहे अविरत! 

       एखाद्या यंत्रासारखी ती स्टेजकडे जाऊ लागली.

Comments