5)आता वेळ आली आहे 'त्या' नं बदलण्याची.'ती' त्याच्या खांद्याला खांदा लावता लावता ,केंव्हाच पुढे निघुन गेली आहे.सगळीच क्षेत्रे पादाक्रांत करुन ती मुसंडी मारते आहे.जिथे पाय रोवले तिथे यशस्वी होते आहे.घर,दार,मुले,नातीगोती सगळं सांभाळून ती पुढे जातेय.तीच्यावर असलेल्या जबाबदाय्राच तीला अधीक सक्षम बनवत आहे.तिचे विचार,तीचं आर्थिक स्वातंत्र्य,सगळंच बदललं आहे.

   तो मात्र अजुनही रुढीवादी,तीला परंपरांच्या,रीतीरिवाजांच्या जोखडात अडकवु पहातोय.तिच्यावर षुरुषी वर्चस्व गाजवु पहातोय.तिच्या दिसण्यावर,शरीरावर ,कपड्यांवर बंधनं घालु पहातोय.तीच्या दुर्बलतेचा फायदा घेऊ पहातोय.त्याचे बुरसटलेले विचार तिच्यावर लादु पहातोय.

  आज गरज आहे तीला 'बाईमाणूस 'म्हणुन नाही तर माणूस म्हणुन वागणूक द्यायची.

Comments