*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 5)*

    

हॉफदॉर्फ!(Hoopddrop). हे नाव आहे माझी मुलगी रहाते त्या शहराचं!अॅमस्टरडॅमपासुन 40—50किमि. अंतरावर वसलेलं.एक छान टुमदार शहर!निसर्ग येथे  सगळीकडेच ठायी ठायी मुक्तहस्ते ऊधळलेला दिसतो.

   एक दीड दिवस विश्रांती झाली.चला तर मंडळी थोडं घराबाहेर पडु.तयार आहात ना माझ्याबरोबर नेदरलँडचं दर्शन घ्यायला! 

  एकाओळीत दुतर्फा असलेली बैठी,कौलारु रो हाऊसेस!अगदी एकसारखी!एका साच्यातुन काढलेली!ऊतरती स्लेट कलरची छपरे!समोरच्या बाजुस पांढय्रा शुभ्र रंगाने रंगवलेला अर्धा भाग!थोडंसं विटांचं काम!एकसारखी दारे!त्यावर फक्त घरांचे नंबर!समोरचं छोटंसं फ्रंटयार्ड!म्हणजे आपलं अंगण!मागे बय्रापैकी मोठं बॅकयार्ड!लाकडी फळ्यांनी बंदिस्त केलेलं!प्रत्येकाच्या घरासमोर फुलझाडे,शोभिवंत झाडे!छोटंसं लॉन,त्यावर डायनिंग टेबल !रंगीबेरंगी ट्युलिप्स,मॅग्निलोया,कामेलिया,डॅफोल्डीस!अशी रंगीत फुलझाडे!घरासमोर कार!किंवा घराशेजारच्या मोकळ्या जागेत कॉमन कारपार्किंग!प्रत्येकाच्या घरासमोर एकतरी सायकल असतेच!तसेच बॅकयार्डला प्रत्येक सदस्याची अशी एक सायकल! घराच्या समोरचा अंतर्गत स्वच्छ सुंदर रस्ता!समोरच दोन चौकोनी डबे दिसले!ती होती कॉमन डस्टबिन्स!त्यावर विस्ताराने लिहीनच!

    काही घरे सोडुन ,मोकळ्या जागेत मुलांना खेळायला जागा!

      कॉलनीतुन बाहेर पडल्यावह नजरेत भरतात ते स्वच्छ,सुंदर,तुरळक रहदारी असणारे रस्ते!प्रत्येक रस्ता हा मधोमध विभागलेला!शोभिवंत झाडांनी सजवलेला!पांढय्रा पट्ट्यांनी मार्क केलेला!एक येणारा!एक जाणारा!त्याच्याच शेजारी लाल रंगाचा जो पट्टा आहे ना!तो फक्त आणि फक्त सायकलसाठी!सायकल ट्रॅक!त्याच्याच पुढे,अगदी कडेला ,पुन्हा काळ्या रंगाचा पट्टा फक्त पायी चालणाय्रांसाठी! रस्ता ओलांंडायला पांढरे पट्टे!त्यावरुन रस्ता ओलांडायचा!पादचारी हा इथला राजा!त्याला पहिला मान!त्याला पांढय्रा पट्ट्यावरुन चालत असतांना कार आदबीने थांबतात!तो गेल्यावरच कार्स जातात!काही ठिकाणी रस्ता ओलांडायच्या ठिकाणी खांबांवर एक धातुचे मोठे बटण असते!ते दाबायचे!त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या खांबावरची इलैक्ट्रॉनीक छबी हिरवी झाली की रस्ता ओलांडायचा!रस्त्यावर कारचा ,बसचा स्पीड अगदी मर्यादेत असतो!भरधाव वेगाने कोणीही कार चालवत नाही!एक हायवे सोडुन!सायकल हे एक अती आवश्यक,सहज आणि सर्रास दिसणारे वाहन!बसस्टॉपच्या पार्कींगमध्ये शंभर सायकलमागे दोन इलेक्ट्रीक स्कुटर दिसतात!सायकलवर विस्ताराने लिहीनच!नेदरलँडभर  असंख्य कॅनाल्स आहेत!संथपणानै वाहणारे!तेवढेच त्याला जोडणारे अगणीत लहान मोठे पुल!त्यामुळे कोणत्याही रस्त्यानै चालु लागलात तरी डोळ्यांना ,मनाला शांतता देणारे कॅनाल्स दिसतातच!त्याच्याबाजुची हिरवळ!पाणपक्षी!कित्येक घरांचे बॅकयार्ड हे कॅनालवर असतात!तिथे डायनिंग टेबल ठेवलेले दिसते!प्रत्येकाची एकतरी छोटी बोट बांधलेली दिसते! सुट्टीच्या दिवशी मासेमारी पण करतात!सांगायचं विशेप म्हणजे इथल्या कॅनालच्या पाण्याची पातळी कधीही वाढत नाही!एकदाच फक्त 1954मध्ये मोठा पुर आला हौता!त्यामुळे घरं सुरक्षित असतात!अगदी लहानमुलं पण घराच्या बॅकयार्डमध्ये निवांत खेळतांना दिसतात! 


 लांबच लांब खड्डेविरहीत स्वच्छ सुंदर रस्ते!फुलांचे ताटवे,कॅनाल्स,त्यातलं वाहणारं पाणी!तुरळक रहदारी!गोरेपान डच लोक सायालवरुन ये जा करणारे!मंडळी आवडली ना आजची झलक!ऊद्या भेटु !नविन काहीतरी घेऊन!

     

*सौ.पुर्वा लाटकर ,अँटवर्प,बेल्जीयम*

Comments