*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 7*

    


बसचा आरामदायक प्रवास करुन आपण शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचतो.आता जायचंय रेल्वेस्टेशनवर.मोबाईलवर तिकिटं आधीच बुक झालीत.त्याचा QR code स्कॅन केला की रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाता येते.थोडक्यात ज्यांच्याकडे तिकिट आहे अशीच मंडळी प्लॅटफॉर्मवर पोहोचतात.प्लॅटफॉर्म पण स्वच्छ,निटनेटके!कुठलेही स्टॉल्स नाहीत,विक्रेते नाहीत.चहावाले,वडापाववाले नाहीत.पेपर विक्रेते नाहीत.फक्त एका काचेच्या कॅबिनेटमध्ये शीतपेये ,वेफर्स तत्सम पदार्थ असतात.कार्ड स्वाईप करुन घेता येतात.वृद्ध व्यक्तिंसाठी लिफ्ट असते.

       येथे फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेन अशा दोन प्रकारच्या ट्रेन असतात.प्रत्येक स्टेशनवर थांबणारी स्लो ट्रेन.महत्वाच्या शहरांच्या स्टेशनवर थांबणारी फास्ट ट्रेन.आमची स्लो ट्रेन होती.ट्रेन थांबताच दरवाजे ऊघडले जातात. ऊघडा दरवाजा असलेल्या ट्रेन येथे नाहीतच.त्यामुळे धावती ट्रेन पकडणे,त्यातुन होणारे अपघात,जाणारे जीव,अपंगत्व हे सगळं अशक्यच! खालुन एक छोटी फळी बाहेर येते.त्यामुळे प्लॅटफाॅर्म आणि रेल्वेत चढायची पायरी यात गॅप राहात नाही. ऊतरणारे ऊतरल्यानंतर शांतपणे लोक चढतात.येथे रेल्वेत सायकल्सना परवानगी आहे.तसेच कुत्र्यांना पण परवानगी असते.

  येथेही टीसी पदावर महिला कार्यरत असलेल्या दिसल्या. 

ट्रेन मध्ये चढताच काही वेळातच ट्रेन सुरु होते.साधारपणे अर्ध्या तासाने एका स्टेशनवर आम्ही ऊतरलो.स्टेशनचं नांव होतं  झांदम!येथे विविध रंगामध्ये रंगवलेली घरे हे मुख्य आकर्षण!इतके सुंदर रंग!बघतच बसावेत असे. रस्त्याच्या मधोमध कॅनाल,कारंजी.दुतर्फा असलेली काॅफी शॉप्स.गिफ्टसची चॉकलटची दुकानं.मोठमोठ्या ब्रँडसची कपड्यांची,शुजची घड्याळांची दुकाने.मॉल्स.रेस्टॉरंटस.रस्ते गर्दिने फुलुन जातात.निवांतपणे चालत.एकएक घर बघत या रस्त्यावर फिरता येते.ब्रिजवर,कॅनाल्सवर ऊभे राहुन फोटो काढता येतात.रस्त्याच्या कडेला खुर्च्यांवर बसुन  कॉफीचा आस्वाद घेता येतो.

    पर्यटकांनी हा भाग अगदी गजबजलेला असतो.आम्ही गेलो त्या दिवशी इस्टर डे होता.त्यामुळे बरीच गर्दी होती. छोट्या पिवळसर अंड्याच्या आकाराची  चॉकलेटसचं वाटप लोक एकमेकांना करत होते.शुभेच्छा दे होते.

     चालुन चालुन दमल्यावर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो.

    *सौ. पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments