*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 11*

     

Say Cheese ......

 

आज आपण जाणार आहोत चीजच्या गावात!अॅमस्टरडॅम परगण्यातील गौडा या शहरात!

 नेदरलँडमधील इतर शहरांसारखेच हे शहर देखील कॅनाल्स,ब्रिजेस,बिल्डिंगच,म्युझीयम,चर्चेस विविध रंगांची घरे यासाठी प्रसिद्ध आहे .पण हे शहर चीजचे नेदरलँडमधील सर्वाधिक चीज निर्मिती करणारे शहर आहे.इथे पाऊल टाकताच चीजची अनेक दुकाने दिसतील.पिवळ्या गोलाकार टायरसारखे वॅक्स कोटींग केलेले चीज सगळ्या दुकानांच्या प्रदर्शनीय जागेत दिसतील.

मला हे चीज बनते कसे याची प्रक्रीया जाणुन घ्यायची खुप ऊत्सुकता होती.शेवटी एकेठीकाणी चीजची कसे बनते हे दाखविण्याचे ठीकाण सापडले.

म्युझीयमसारखी वास्तु होती.तिकीट काढुन आम्ही आत गेलो.आत एका पडद्यावर चीजचा इतिहास थोडक्यात सांगीतला गेला.त्यानंतर पुर्विच्या काळी चीज कसे बनत असे त्याची प्रक्रीया सांगीतली गेली.त्यासाठी वापरलेली भांडी आजही जतन करुन ठेवलीत

गाईचे दुध साठवुन ,त्याचे दह्यात रुपांतर करायचे.ते दही एका मोठ्या दाबाच्या यंत्राखाली ठेऊन त्यातलं पाणी काढुन टाकायचं !आणि एका विशिष्ट तापमानाखाली ठेवायचं.ते बनलेलं घट्ट झालेलं चीज टिकण्यासाठी वरुन वॅक्सचं कोटींग करायचं.चिज जितकं जुनं तितकं ते घट्ट होत जातं,त्याची किंमत वाढत जाते.जुनं ते सोनं ही म्हण चीजच्या बाबतीतही लागु पडते.

आजही हीच प्रक्रिया आहे फक्त हे काम करणारी अत्याधुनिक यंत्रे आली आहेत.आज गाईचा चारा कोणता हवा,पाणी किती द्यायचे,गाईची काळजी कशाप्रकारे घ्यायची याचे मोजमाप करणारी यंत्रे आली आहेत.दुध काढण्यापासुन दही लावण्यापर्यंत ते त्यावर विशीष्ट दाब देऊन त्याचे ऊत्कृष्ट चीज कसे बनेल हे सगळे आधुनिकीकरण झाले आहे.चीज साठवण्याची पण एक पद्धत असते.त्याप्रमाणेच वर्गवारी करुन ते क्रमाने लावले जाते.

   नेदरलँडसमधील हे गौडा शहर गौडाचीज या नावानेच प्रसिद्ध आहे.चीज असावं तर गौडाचंच!जशी चितळेंची बाकरवडी!

एकटं गौडा शहर 3 बिलियन युरो इतकं चीज निर्यात करते.


चीज म्हटलं की आपल्याडोळ्यासमोर एकच प्रकारचे चीज येते.पण इथे अनेक चवींचे चीजचे प्रकार पाहायला मिळतात.कोणतं चीज कधी खायचं याचेही काही संकेत ठरलेले असतात.आठ दिवसांपुर्वीचं चीज याला 'यंग चीज' म्हणतात..वेगवेगळ्या प्रसंगानुसार ते ते चीज डच लोक वापरतात.प्रत्येक चीजची चव,त्याची खासीयत,त्याचे थोड्याफार फरकाने बदलणारे रंगरुप!

चीजची एकएक दालने पार करत शेवटचे दालन चीज टेस्टींगचे आहे.यात वेगवेगळ्या प्रकारचे चीजक्युब्ज खायला देण्यात येतात.त्यावरुन त्या चीजचे 'वय' ओळखायचे असते.ते ओळखलंत तर तुम्ही चीजचे दर्दी झालात म्हणुन समजा!अर्थात आम्हांला कोणालाच ओळखता आलं नाही.पण एक मस्त अनुभव घेऊन बाहेर पडलो.शेवटी 'से चीSSSज म्हणत फोटोही काढला.!

 *सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments