*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 16*


 डच व्यक्तिंचे पहिले दर्शन मला झाले ते म्हणजे विमानाचा केबिन क्रु!पायलट,हवाईसुंदरी आणि इतर स्टाफ!

डच व्यक्ति या छान ऊंचापुय्रा सहा ,सात फुटांपर्यंतची ऊंच माणसे बघीतली आहेत.मजबुत पण बांधा.कोणीही  जाड,ढेरपोटी ,थुलथुलीत अशा व्यक्ति आढळल्या नाहीत.रंग अर्थात गोरापान!सोनेरी केस !

अतिशय हेल्दी!आनंदी हसतमुख!चटपटीत!

   डच व्यक्ति आपल्या कामाशी अगदी कर्तव्यनिष्ठ असतो.इथल्या अॉफीसेसमध्ये टी ब्रेक,कॉफी ब्रेक,ब्रेकफास्ट अशांसाठी वेळा नसतात.एकदा कामावर आल्यावर पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रीत असतं.ज्याला वाटेल त्याने जाऊन काॅफी आणावी.दुफारच्या जेवणासाठी मात्र सगळे एकत्र जमतात.

अॉफीसमध्ये मोबाईलवर बोलणे.व्हॉटसअप वापरणे यावर अलिखीत बंदी आहे.असे करणे शिष्टसंमत नसते.

कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणे,ढवळाढवळ करणे यांना आवडत नाही.कामापुरतं काम !वेळेवर अॉफिसला येणे,कोणाकडे जायचे असेल तर ती वेळ पाळणे हे यांच्या रक्तातच आहे.अगदी काही लोकंच अॉफीसच्या सहकारी या नात्यापुढे जाऊन बोलतात!

दिवसभर काम केल्यावर पाच वाजले की डच व्यक्ती तीचा लॅपटॉप शट डाऊन करत ,घरचा रस्ता धरते.

येथे फॅमिलीला वेळ देणे खुप जास्त महत्वाचं समजतात!पाच नंतरचा वेळ पूर्णपणे फक्त कुटुंबासाठी!त्यासाठीच इथली सगळी सगळ्याप्रकारची दुकाने पाच नंतर धडाधड बंद होतांना पाहीली आहेत.खरंतर दुकानांत गर्दी आहे.खरेदी चालु आहे तरीही  पाच वाजता शटर डाऊन.कारण दुकान चालविणारे लोक,कामगार यांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत वेळ घालवीता यावा.

अजुन एक कारण असंही आहे की विंटर सिझनमध्ये एवढी थंडी असते की अंधार लवकर पडतो,थंडीमुळे लोक लवकर घरी जातात.त्यामुळेही दुकानं लवकर बंद करत असावेत.डच लोक रात्रीचं जेवण संध्याकाळी पाच ते सहा या वेळातच घेते.रात्रीचं जेवण हेवी असतं.जास्त करुन नॉनव्हेज!

 सकाळी ओटस,दुध ,ब्रेड असा नाष्टा घेतात,तर दुपारी चीज घालुन काकडी,टोमॅटो,घालुन सँडवीचेस असतात.

येथे सायकल,चालणे यामुळे या लोकांच्या तब्येती चांगल्या असतात.या शिवाय फुटबॉल,व्हॉलीबॉल,टेबलटेनीस,लॉनटेनीस,ज्युदो,जिम्नॅस्टिक्स,स्केटींग,सायकलिंग या खेळांचे मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण घेतांना मुले आढळली.तरुण मुली कोणतेतरी वाद्य शिकतांना दिसल्या.

 इथे किंडरगार्डन पासुन दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत दीले जाते.शाळा घराच्या अगदी जवळच असतात. त्यामुळे चालत,सायकलवर मुलांना जाता येते.स्कुलबस येथे अजिबात नाहीतच.सगळ्याच शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते.ऊगाचच मुलांना दूरच्या शाळेत घालायचा व्याप वाचतो.

सगळेच शालेय विषय डचभाषेतच शिकवले जातात.इंग्रजी विषय बेसीकपणे शिकवला जातो.मुलांवर अभ्यासाची सक्ती ,दडपण नसते.आपले भारतीय पालक अभ्यासाची काळजी  करत असतील तर त्यांनाच तुम्ही रिलॅक्स रहा.मुलांमा ताण देऊ नका.आम्ही आहोत असे सांगीतले जाते.परिक्षा,मार्क्स, त्याचा बागुलबुवा नसतो.

दहावीनंतरचे शिक्षण थोड्या फीज घेऊन पूर्ण करता येते.

    जवळजवळ सगळ्याच मॉल्समध्ये,कॉफीशॉपमध्ये ,ग्रोसरी शॉपमध्ये तरुण मुलेमुली काम करतांना दिसली.याऊलट महत्वाच्या पदांवर चाळीस ते साठ,पासष्टीपर्यंतच्या या वयोगटातील व्यक्ति काम करतांना आढळल्या.

  डच व्यक्ति स्वत:च्या कुटुंबात छान रमतो,सगळे सणवार,वाढदिवस सेलिब्रेशन सगळे इव्हेंटस कुटुंबातच साजरे केले जातात.एकत्र जमणं.जेवणं खाणं,पिणं,हास्यविनोद,गप्पा मारणं.हे त्याला आवडतं.बाहेरच्या व्यक्तींना पटकन  सामावुन घेत नाहीत

वक्तशीरपणा,स्वच्छता,कामसु,कलात्मक दृष्टीकोन या त्यांच्या जमेच्या बाजु.

तर तरुणांपासुन ते अगदी हातात काठी घेतलेल्या व्यक्तींपर्यँत स्मोकींगचे प्रमाण खुप जास्त आहे.सार्वजनिक ठिकाणी पण यावर निर्बंध नाहीत.त्यामुळे सिगारेटची थोटकांचा कचरा सगळीचडेच दिसतो.स्रिया आणि पुरुष दोघेही सारख्याच प्रमाणात स्मोकींग करतांना पाहिले.एक आजीबाई तर एका हातात काठी आणि एका हातात सिगारेट घेऊन रस्त्याने चालत जात होत्या.काय म्हणावं याला.

 याचबरोबर ड्रींक्सचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे.वाईन,बिअरचे ग्लास घेऊन तासन तास गप्पा मारत बसलेले लोक जागोजागी दिसतात,

  अजुन एक म्हणजे डच लोक भलतेच गप्पीष्ट,बोलघेवडे आढळले.कॉफीशॉपमध्ये,रेस्टॉरंटसमध्ये अंगावर ऊन घेत मित्रमैत्रिणी,आजोबांचे गट,आज्ज्या,कुटुंबीय ,सहकारी  सगळेच ,तरुणाई मोठमोठ्याने गप्पा मारत,हास्यविनोद करतांना पाहीले.अापल्या मासळी बाजारची आठवण आली.

  काहीही म्हणा मला तरी ही चेहय्रावर हास्य असलेली ,अजिबात स्ट्रेस नसलेली,दु:खी चेहरे नसलेली.मोठमोठ्याने गप्पा मारणारी,मोकळी ढाकळी ,काहीशी रिझर्व्हड डच मंडळी भावली. 

   तुम्हांला काय वाटतं!

     

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*


Comments