*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 18*


    *अँटवर्प  बेल्जीयम*

 अँटवर्प बेल्जीयममधील एक महत्वाचे मोठे शहर!या शहराला  ऐतिहासिक  काळाचा वारसा  लाभलेला आहे . चौदाव्या ,पंधराव्या शतकापासुनच येथे नदीतुन मालवाहतुक व्हायची.तसेच मासेमारी पण व्हायची.कोळीबांधवांसारखी जमात येथे होती.

  अँटवर्प शहर हे आता नव्या आणि जुन्याचा अनोखा मिलाफ आहे.नवीन ब्रँडची आधुनिक दुकाने आणि पुरातन कालातील वास्तु जणु एकमेकांच्या हातात हात घालुन दिमाखात ऊभी आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागात जुने ऊंच कोरीवकाम असलेले चर्च कोठुनही लक्ष वेधुन घेते.चर्चच्या थोड्या अंतरावर दोन भव्य राजवाडे आहेत.त्याच आवारात एक बलदंड व्यक्ति हातात तोडलेला घेऊन आवेशात ऊभी असलेली दिसते.त्याबद्दल दंतकथा अशी,की मासेमारी करायला येणाय्रांवर एक दृष्टप्रवृत्तीचा माणुस निर्बंध घालायचा,त्यांना त्रास द्यायचा.याचा पाडाव करायला कोणालाही जमत नव्हते.शेवटी शेजारच्या गावातुन एक गुराखी मेंढपाळ यायचा त्याने धाडस दाखवुन या दृष्ट माणसाचे दोन्ही हात कापले.एक हात भिरकावुन शहराच्या मध्यवर्ती भागात पडला.त्याची प्रतिकृती अजुनही तेथे आहे तर एक हात त्याच्या हातात आहे.

  येथे जवळच समुद्रासारखी विशाल पात्र असलेली नदी आहे.यातुन आजही मालवाहतुक,दोन पात्रांमध्ये फेरीबोट तसेच अनेक देशांसाठी मोठमोठ्या क्रुझ शिप्स चालतात.नदीखालुन एक मोठे टनेल काढले आहे  यातुन जाणारा रस्ताते दोन्ही पात्र जोडतो.त्याचं दुरुस्तीचे काम असल्याने पाहता आला नाही.

नदीला लागुनच एक भुईकोट किल्ला आहे.मध्यमआकाराचा दोन मजली किल्ला आहे.किल्ल्याच्या भाग प्रदर्शनासाठी राखुन ठेवला आहे.तरी काही भाग बघण्यासाठी जाता येते.मला फारसा भावला नाही किल्ला.आपल्याकडच्या दगडी,चिरेबंदी,बेलाग ,वर्षानुवर्षे  पाऊस वाय्राचा सामना  करणाय्रा बुलंद किल्ल्यांची आणि त्याचबरोबर शिवरायांची आठवण आली.

 अरुंद चिंचोळे रस्ते.शहरातुन ये जा करणाय्रा बसेस,ट्राम्स,सायकल्स ,कार्स आदींची वाहतुक मोठ्या प्रमाणात होती.शहर पर्यटकांनी नेहमीच गजबजलेले असते.

   अँटवर्प हे शहर फार पुर्वीपासुनच हिय्रांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.शहरातील सेंट्रलस्टेशनपाशी तर हिय्राच्या दुकांनाच्या रांगाच्या रांगा आहेत.गुजराथी लोक येथे मोठ्या प्रमाणावर आहेत.

      शहराचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं सेंट्रल स्टेशन!एक रेल्वेस्टेशन आहे.यासाठी खास ऊद्याचा लेख!आजच्या भागात त्याबद्दल लिहीलं तर तो त्या स्टेशनवर अन्याय होईल.मी असं का म्हणतेय ते ऊद्याच्या भागात कळेलच!


*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments