*अलिबाग ते अॉमस्टरडॅम लेख 23*

  

  स्विर्झलँडच्या दिशेने स्किफॉल एअरपोर्ट अॅमस्टरडॅम वरुन विमानाने झेप घेतली.नेदरलँडस  ते स्विर्झलँडस हे अंतर सहाशे अठ्ठाविस किलोमिटर इतके आहे.त्यासाठी 'बासल' या एअरपोर्टवर ऊतरणे आवश्यक होतं साधारणत:तास दीडतासाचा प्रवास होता..तेथुनच सगळी प्रेक्षणीय स्थळं जवळ होती.

  'बासल' एअरपोर्टबद्दल थोडंसं.

कोणत्याही देशांच्या सीमा म्हंटलं  की एक सीमारेषा नजरेसमोर येते.एखादी भिंत,कपांऊंड किंवा तत्सम काहीतरी.पण या 'बासल' एअरपोर्टची गंमतच आहे.या एअरपोर्टला Euro Airport  म्हणतात.कारण हे एअरपोर्ट तीन देशांच्या सीमारेषेवर वसलं आहे.विमानातुन ऊतरल्यावर या  एअरपोर्टवर दोन बोर्ड दिसतात.त्यावर त्या दिशेने जाणारा बाण दिसतो.FRANCE   हे नांव लिहीलेली अक्षरे पाहीली .आधी वाटलं फ्रान्सला ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी कनेक्टींग फ्लाईट आहे.नंतर कळलं फ्रान्स तेथुन अगदी काही किमी अंतरावर आहे.दुसरीकडे स्विर्झलँडसचा बोर्ड आहे.ते ही जवळच्या अंतरावर आहे.तर एअररपोर्टचा काही भाग Germany  या देशांतही येतो.थोडक्यात तीन देशांच्या सीमारेषेवर वसलेलं हे  विमानतळ हेच याचं मोठं वैशिष्ट्य आहे.

   विमानतळाचा सगळा कारभार फ्रान्स आणि स्विर्झलँडस हे  दोन देश मिळुन संयुक्तिकरित्या चालवतात.विमानतळापासुन स्विर्झलँडच्या दिशेने ने आण करायला एअरपोर्टची फ्री बससेवा आहे.ती बासल या शहरातल्या  सेंट्रल रेल्वेस्टेशन पर्यंत जाते.एअरपोर्टवरुन बस निघाली की एका रस्त्याच्या कडेला फ्रान्सची  हिरव्या रंगाची   FRANCE लिहीलेली पाटी दिसते.तीच एकमेव हद्दीची खुण!फ्रान्सच्या हद्दीत असलेल्या सगळ्या घरांच्या नेमप्लेटस,दुकानांच्या पाट्या सगळी अक्षरे ही गडद हिरव्या रंगावर पांढरी अक्षरे दिसुन येतात .हिच एकमेव साक्ष की आपण फ्रान्सच्या हद्दीत आहोत.

  पुढे स्विर्झलँडसमध्ये प्रवेश करतांना हीच नेमप्लेटस,दुकानांच्या पाट्या,पोस्टाच्या पेट्या,ट्राम,बस यांचा रंग पिवळा होतो.यावरुन आपण स्विर्झलँडमध्ये आल्याचे कळते.

जर्मनीचा तसा ठळक जाणवणारा काही ऊल्लेख किंवा खुणा दिसुन येत नाहीत पण काही भाग मात्र त्या देशाच्या हद्दीत येतोच. 

  या एअरपोर्टवरुन बासल 6


 किमी (Basal-Switzerland).दुसरं मलहाऊस 22 किमी (Mulhouse -France) .तिसरं  फ्रिबर्ग  70 किमी.(Freiburg _Germany) अशी या युरो एअरपोर्टपासुन तीन्ही देशांची अंतरं आहेत.

  एअरपोर्टवरुन बाहेर पडुन आम्ही बसमध्ये बसलो.ही बस आम्हांला सेंट्रल रेल्वेस्टेशनपर्यंत घेऊन जाणार होती.

येथुन ट्रेन पकडुन आम्ही Thun या गांवी पोहोचलो.येथुन स्विर्झलँडस येथे  प्रसिद्ध  असलेले Interlaken  —इंटरलाकन हे शहर जवळच  होते.

 दुपारी एकवाजता घरातुन बाहेर पडलो होतो.पाचची फ्लाईट होती.Thun -थुन या गावांतल्या हॉटेलपर्यंत पोहोचेपर्यंत रात्र झाली होती.

    *सौ.पुर्वा लाटकरअॅमस्टरडॅम*

Comments