*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख  27*

    Madame Tassaudes Amsterdam.


 शनिवारी वेदर चांगलं होतं!सनी होतं.आमचा सखा सोबती पाऊस पण विकली अॉफवर गेला होता.त्यामुळे पुन्हां एकदा अॅमस्टरडॅमला जायचे ठरवले.

     घरापासुन बस,पुढे स्प्रिंटर ट्रेन .अर्ध्यातासात अॅमस्टरडॅम.

    आता बय्रापैकी माहिती झालंय आणि सवयीचही.त्यामुळे नाविन्य काहि वाटत नाही.

 स्प्रिंटर ट्रेन (लोकल सारखी)घेऊन अॅमस्टरडॅम सेंट्रल रेल्वेस्टेशनला ऊतरलो. हे ट्रेन स्टेशन पण भले मोठे आहे. आतला भाग आधुनिक कॉफी शॉप्स,रेस्टॉरंटस,तिकीटाच्या मशिन्स ,मॅकडोनाल्ड,स्टारबक्स हे ही सगळीकडे असतातच.तसंच होतं

  अनेक प्लॅटफॉर्म्स,इलेव्हेटर्स,जीने,लिफ्टस इत्यादी सोयींनी सज्ज.आज पहिल्यांदाच इथे खुप गर्दी दिसली.गेल्या दीड महिन्यात एवढी गर्दी कोठेही बघीतली नाही.

    गर्दीतुनच वाट काढत बाहेर आलो.अॅमस्टरडॅम सेंट्रल स्टेशन हे पण बाहेरून खुप आकर्षक जुन्या काळातले  आहे. मोठमोठे डोम.त्यावर सोनेरी रोमन लिपीतील घड्याळ,अनेक सोनेरी प्रतिकृती असलेलं हे स्टेशन .बेल्जीयमच्या अँटवर्प सेंट्रल रेल्वेस्टेशनची आठवण करुन देते.

      स्टेशन जवळच मोठा कॅनाल आहे.ऊतरुन चालत चालत मुख्य रस्त्यावरुन इमारती बघत होतो.येथेही इमारतींची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी,विविधता आहे.काही इमारती तर झुकल्यासारख्या वाटतात.तर काही मागे सरकल्यासारख्या वाटतात.पण हेच त्या बांधकामाचे वैशिष्ट्य होय.

  रस्ता गर्दिने नुसता वाहात होता.मला मुंबईच्या गर्दीची आठवण आली.

        चालतच पंधरा मिनिटाच्या आवारातच मॅडम तुस्साद नावाचे सुप्रसिद्ध वॅक्स म्युझीयम आहे.मॅडम तुस्साद वॅक्स म्युझीयम्स जगभरात अनेक ठिकाणी आहेत.त्यापैकीच एक अॅमस्टरडॅमयेथील वॅक्स म्युझीयम.

       याची सुरवात 1970 साली झाली.त्या म्युझीयमची बिल्डींग लांबुनच लक्ष वेधुन घेते.दर्शनी भागावर ऊंच इमारतीवर दोन भले मोठे पुतळे आहेत.मध्यभागी सोनेरी अक्षरात `Madame Tussuades' असे नांव आहे.

याचे तिकीट अॉनलाईनपण काढता येते.आम्ही तिकडे गेल्यावर काढले.तिकिट काऊंटरपाशीच फुटबॉलपटु मेस्सीचा पुतळा आहे.त्याचे रंग ,रुप ,ऊंची, स्कीनचा कलर,डोळे सगळेच अगदी जीवंत वाटतात.एक फोटो काढलाच तिथे.

    तिकीट घेऊन आत शिरलो.सुरवातीलाच तुमचा एक फोटो काढला जातो.आणि एक कार्ड दिलं जातं.

     मॅडम तुस्साद वॅक्स म्युझीयम चार,पाच मजली आहे.

प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या विभागात सेलिब्रेटीजचे पुतळै आहेत.

   गेल्या गेल्याच टायटॅनीकमधला हीरो लिओनार्दो दी कॅप्रीओ सामोरा येतो.पुढे लंडनचे प्रिन्स आणि त्यांची पत्नी मेघन मर्कल यांचा पुतळा आहे.हॉलिवुड सिनेमातील अनेक प्रसिदध नटनट्या या विभागात आहेत.

पुढच्या विभागात अॅनीमेटेड सिनेमातलं पात्र 'श्रेक' नावाची बाईंचा पुतळा आहे.

जेम्सबॉंड व्यक्तीरेखा साकारवेल्या दोघांचे पुतळे आहेत.

 हे सगळेच पुतळे इतके जीवंत आणि हुबेहूब आहेत ना की थक्क व्हायला होतं.जणु ती व्यक्ती आपल्यासमोर ऊभी आहे.

    सगळ्यांना हसविणारा पण स्वत:च्या जीवनात अपार दु:ख असलेला चार्लीचॅप्लिन पण येथे आहे.तसेच जुनी हॉलिवुडची नायीका मर्लिन मन्रो देखील आहे.तीचा झगा तसाच वाय्राने ऊडतांना दिसतो.

पुढे अनेक खेळाडु टेनीसपटु,बॉक्सर,फार्म्युला रेसर कार चालविणारे,स्केटर सगळ्यांचे त्या पोझमधील पुतळे आहेत.

 जागतिक राजकारणातले सुप्रसिद्ध चेहरे अमेरीकेचे प्रेसिडेंट बराक ओबामा,डोनाल्ड ट्रंप,जर्मनीच्या प्रेसिडेंट अँजेला मर्केल,अादरणीय गांधीजी.गांधीजींसोबत फोटो काढतांना डोळे भरुन आले.आपण त्यांना पाहीलंही नाही पण आज शेजारी ऊभं राहुन फोटो काढतांना त्यांचा मोठेपणा  आठवुन मन भारावुन गेलं.

   सौंदर्याची खाण असलेली प्रिन्सेस डायना पण येथे आहे.

गांधीजींच्या शेजारी दलाई लामा शांतीचा संदेश देत ऊभे आहेत.

सगळ्यात जास्त आवडलेली या म्युझीयममधील व्यक्तीरेखा म्हणजे 'छोटी अॅन फ्रँक' .याच ठिकाणी एका लहानशा खोलीत खुर्ची,टेबल आहे.खुर्चीवर बसुन ,टेबलवर डायरी लिहीणारी,विचारमग्न असणारी अॅन फ्रँक दिसते.इथेच तीची एक सुटकेस,मोठी लाकडी पेटी,तीची झोपण्याची कॉट ,कपडे इत्यादी वैयक्तीक वस्तु दिसतात.डोळ्यासमोरुन 'अॅन फ्रँकची डायरी' हे पुस्तक तरळून गेले.लहानग्या अॅनला सोसाव्या लागलेल्या अनेक हाल अपेष्टा,अन्याय ,सभोवतीचं दहशतीचं वातावरण सगळं सगळं आठवलं.त्या खोलीत क्षणभर थिजल्यासारखं झालं.असं वाटलं तो काळ इथे आठवणींच्या स्वरुपात गोठवुन ठेवलाय.

   यानंतरच्या विभागात सिंगर्स,डीजे ,रॅम्पवॉक करणारे होते.सगळेच अनोळखी.

एके ठिकाणी अल्बर्ट आईन्स्टाईन कट्ट्यावर बसल्यासारखे भिंतीवर बसलेले दिसतात.जीन्यातुन ऊतरतांना एकदम समोर येतात.अनेक शास्रज्ञ,वास्तुविशारद,पेंटर,चित्रकार सगळ्यांचे पुतळे एके ठीकाणी एकवटलेले आहेत,

.प्रसिद्ध गुढ असे मोनालीसाच्या पेंटींगची पण वॅक्समध्ये साकारलेली तसबीर आहे.

      राजघराण्यातील अनेक दीग्गज चेहरे पण येथे पुतळ्यांच्या स्वरूपात दिसतात.

    अार्यन लेडी मार्गारेट थॅचर,ब्रिटनची राणी ,राणीच्या खुर्चीची प्रतीकृती आहे.

टेलिव्हिजनच्या विश्वातले गाजलेले अँकर पण येथे आहेत.

एका विभागात डच लोक पारंपारिक वेषात दिसतात.

     लहान मुलांना आवडतील असे स्टार वॉर्स चित्रपटातील अनेक व्यक्तीरेखा येथे आहेत.

एकेठीकाणी बॅटमॅन ,स्पायडरमॅन  आदींचे पुतळे आहेत.

प्रत्येक मजला फिरत तास दीडतास सहज निघुन जातो.आणि Exit चा दरवाजा कधी येतो कळतही नाही.

 खरंतर  आपले अनेक सेलिब्रेटी ,खेळाडु तिथे दिसतील अशी  अपेक्षा मनांत ठेवुन मी गेले होते.पण गांधीजींचा पुतळा वगळता कोणीच नव्हते.थोडंसं वाईट वाटलं.

    याच आवारात नेदरलँडसच्या राजाचा  भला मोठा राजवाडा आहे.तिथे अनेक जण वाद्य वाजवुन आपला ऊदरनिर्वाह चालवितांना दिसले.

येतांना त्याच गर्दिच्या रस्त्यावर एक इंडीयन रेस्टॉरंट दिसले.त्याचं नांव होतं 'गांधी'.आत गेलो.गरमागरम सामोसे ,भजी,काॅफी घेतली. तीच्या रस्त्यावर पुन्हां फोटो सेशन झालं.अॉमस्टरडॅम सेंट्रलस्टेशनवरुन परतीची स्प्रिंटर पकडली .घरी आलो.


 *सौ. पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*


     




टे

Comments