*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 28*

   

 *सारं काही अॉटोमॅटीक*


   नावावरुनच आजच्या लेखाचा विषय लक्षात आला असेल.

   नेदरलँडसमध्ये किंवा एकुणच परदेशात मनुष्यबळ कमी असल्याने सगळ्याच गोष्टी यांत्रिक पद्धतीने करण्यावर भर असतो. त्याच विषयी थोडसं बघीतलेलं ,अनुभवलेलं.

    सुरवात घरापासुनच करु यात.इथे घरी `अलेक्सा' नावांचं यंत्र बसवलंय.तीला रोज सकाळी ऊठलं की वेदर विचारायचं.त्याचे रोजचे अपडेटस ती देते.दर तासाला किती वाजले ते सांगते.तीला सूचना दीली की रिमाईंदर लावते.अलार्म सेट करता येतो.टीव्ही चालु बंद करते ती.घरातले किचन,डायनिंग,हॉलचे लाईटस,बॅकयार्ड,फ्रंटयार्डचे लाईटस लावते,बंद करते.वॉशिंग मशीनचे कपडे धुऊन झालेत ते आठवण करुन देते.

 माहीती हवी असेल तर सांगते,म्युझीक लावते.

  एवढंच काय बाहेरच्या मेनडोअरला कोणी आलं असेल तर ती सावधगिरीची सुचनाही देते.

घरात रोबोटिक व्हॅक्युम क्लिनर आहे.अलेक्साला सांगीतलं की तशी सुचना ती त्या व्हॅक्युम क्लीनरला देते.ते व्हॅक्युम क्लिनर  स्वत:च चार्जींग पाॅईंटपासुन निघुन  गोल गोल फिरत सगळं घर स्वच्छ  करतं.कासवासारखा दिसणारं हे यंत्र घरात फिरुन ,सोफ्याखाली,टेबलाखाली जाऊन सगळं स्वच्छ करतं.

  या शिवाय डीश वॉशर,सुप मेकर,सँडवीच मेकर ,मायक्रोव्हेव अशा सुविधांनी किचन मधलं काम हलकं होतं.

युद्धामुळे गॅस थोडा कमी मिळतोय म्हणुन इंडक्शनचा वापर जास्त करावा लागतो.गॅसचा एखादाच बर्नर वापरता येतोय.

    घराबाहेर बसमध्ये अॉटोमॅटिक तिकिट व्हेंडीग मशीन,रेल्वेस्थानकावर पण तिकीटांसाठी मशीन्स.एखाद्या ग्रोसरी शॉपमध्ये गेल्यावर सुद्धा सेल्फ स्कॅनिँग करुन बील स्वत:च बनवावं लागतं.

मॅकडोनल्डस ,पिझ्झा सेंटर या ठिकाणी देखील हवी ती अॉर्डर स्क्रिनवरुन द्यावी लागते.

       रेल्वेच्या गेटजवळ कोणीही तिकीट तपासनीस नसतो.स्वत:चं तिकिट स्कॅन केलं तरच दार ऊघडतं.

      परवा अॅमस्टरडॅमला एका फुडजॉईंटच्या बाहेर मोठ्या काचेच्या केबीनमध्ये अनेक ताजे खाद्यपदार्थ तयार करुन ठेवले होते.ते देखील सिलेक्ट करायचे ,बील ATM ने भरायचं.तुम्हांला लगेच तो पदार्थ  मिळतो.

   माझ्या डोळ्यासमोर आपल्याकडचे कांदेपोहे,ऊपमा,भजी,वडापाव,सामोसा,इडली चटणी अशा अनेक पदार्थांचं भरलेलं काचेचं केबिन दिसु लागलं.

    रेल्वेस्टेशनवर पण प्लॅटफॉर्मवर ठिकठिकाणी अशीच शीतपेय,लेज ,ज्युसेसने भरलेली काचेची कपाटे असतात.आपण सिलेक्ट करुन ,बिल करायचं ,हवं ते खालच्या ट्रेमध्ये येतं.

     खरी गंमत पुढेच आहे.बेल्जीयममध्ये आम्ही एक स्टुडीओ अपार्टमेंट बुक केलं होतं.तीन दिवसांसाठी.माझी अशी कल्पना होती की तिकडे गेल्यावर त्या फ्लॅटची चावी देणारं कोणी तरी असेल.केअरटेकर ,मॅनेजर,मालक .आम्ही त्या अपार्टमेंटच्या बाहेर पोहचलो.दरवाजा बंद होता.आता वाटलं  की बेल वाजवली की आतुन कोणी तरी येईल.मग मुलीने मोबाईल काढला,वाटलं फोनवर सांगेल आम्ही अालोय.पण तीने मोबाईल काढला त्यातला सिक्रेट कोड दरवाजाबाहेर असलेल्या चौकोनी बॉक्समध्ये असलेल्या आकड्यांमध्ये टाकला.त्या बरोबर अपार्टमेंटची किल्ली खालच्या बॉक्समध्ये आली.अपार्टमेंट अगदी सुसज्ज,स्वच्छ,आवश्यक असणाय्रा सगळ्या बाबी तिथे होत्या.कीचनपण या अपार्टमेंटमध्ये असतात.त्यात स्वयंपाकाला लागणारी भांडी,मायक्रोव्हेव,इंडक्शन ,फ्रिज,डीशवॉशर आणि कॉफी,साखर अशा दैनंदीन लागणाय्रा वस्तु असतात.आपण बाहेरचं खाऊन कंटाळलेलो असतो ,अशावेळी घरगुती केलेला नाष्टा,खीचडी छान वाटते.

    स्विर्झलँडमध्ये पण असाच अनुभव आला अपार्टमेंटचा.त्यावेळी तर बरीच रात्र झालेली.मोबाईलच्या टॉर्चच्या ऊजेडात घर नंबर शोधुन मोबाईलवर असलेला कोड टाकुन किल्ली मिळवेपर्यंत मनांत धाकधुक होती.

   रस्ते झाडणे,कचरा ऊचलणे यासाठीही यंत्रेच काम करतात.

     अशी ही सगळी अॉटोमॅटिक सुविधा,आपल्याला समजेपर्यंत अवघड वाटते.एकदा सगळं शिकुन,माहीत करुन घेतलं की सगळंच अगदी सोप्पं वाटु लागतं.


     *सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments