*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 29*


  रवीवार होता!सुट्टीचा दिवस!साहजीकच निवांतपणा होता.एरवी शांतता असलेला घराचा परिसर आवाजाने गजबजलेला होता.पुढे जाऊन डोकावुन पाहीले असता तेथे फुटबॉलच्या मॅचेस रंगात आल्या होत्या.लहान मुले,मोठी मुले,कॉलेजचे तरुण अशा विविध वयोगटातल्या मॅचेस तेथे चालु होत्या.

    नेदरललँडसचा राष्ट्रीय खेळच फुटबॉल आहे.तो तर लोकप्रिय आहेच.पण इकडे जरा वेदर चांगलं असेल तर लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सगळेच बाहेर पडतात आणि कोणता ना कोणता खेळ खेळतातच.

  मुख्यत्वे फुटबॉल,व्हॉलिबॉल,स्केटींग,सायकलिंग,ज्युडो कराटे,जिम्नॅस्टीक्स,स्विमिंग ,टेबल टेनीस,लॉन टेनीस असे खेळ खेळले जातात. 

  अॅमस्टरडॅम शहरातच निव्वळ आठशे स्पोर्टस क्लब आहेत.या विविध क्लबमधुन अनेकविध खेळांचे प्रशिक्षण दीले जाते. सराररी तीन मधला एक डच व्यक्ति कोणत्या ना कोणत्या स्पोर्टस क्लबचा सदस्य असतो.  

 नेदरलँडसमधले दोन तृतियांश लोक खेळाशी निगडीत आहेत.देशाची लोकसंख्या सतरा मिलियन आहे.त्यातले पाच मिलियन लोक देशातल्या  पस्तीसहजार स्पोर्टसक्लबशी जोडले गेले आहेत.

इथे संध्याकाळी पाच ते सहा या दरम्यान जेवतात.त्यानंतर  ही मुलं  घराबाहेर पडुन क्लबमधुन प्रशिक्षण घ्यायला जातात.सहाच्यापुढे सगळे क्लब्ज,ग्राऊंडस गजबजलेले असतात.

  डच लोकांना त्यांच्या घरी अचानक जाणे,भेट देणे (Surprise visits) अजिबातच आवडत नाही.त्यांचा वेळ ते कोणत्या ना कोणत्या स्पोर्टस अॅक्टीव्हिटीज साठी राखुन ठेवतात.त्यांच्यासाठी स्पोर्टस म्हणजे एक खेळ,मनोरंजन ,तसेच एक अॅक्टीव्हिटी म्हणुन बघीतले जाते.

   क्रिकेटही खेळतात.क्रिकेटची टीम आहे.तसेच हॉकी,आईस स्केटींग,स्पीड स्केटिंग,स्विमिंग,रोईंग गोल्फ,अॅथलेटीक्स, गाड्यांची फॉर्म्युला वन रेस,घोडेस्वारी.वॉकींग पण हा एक स्पोर्टसचा प्रकार आहे.याच्याही स्पर्धा घेतल्या जातात.

   बरेचसे या देशाचे पारंपारिक खेळ पण आहेत,ते देखील मोठ्या प्रमाणावर खेळले जातात.

   डच लोक खेळावर अतोनात प्रेम करतात,पण फुटबॉल म्हणजे त्यांचा जीव की प्राण !वर्ल्ड फुटबॉल चॅम्पियनशिप असेल त्या दिवशी   सगळे नेदरलँडर्स रस्त्यावर ऊतरतात.त्यावेळी त्यांनी घातलेल्या अॉरेंज कॅप्स,टीशर्टस,जॅकेटस यामुळे रस्ते अॉरेंज कलरने वाहात असतात.

   डच लोकांसाठी  स्पोर्टस हा आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. स्पोर्टस जणु त्यांचा धर्मच इतका प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला असतो.अगदीच खेळात सहभागी झाले नसलेले डच टिव्हिवर तासन तास मॅचेस  बघणं पसंत करतो.प्रत्येकाची आपली अशी आवडती टीम असते.आवडता,लाडका खेळाडु असतो.

   अाजवर या चिमुकल्या देशाने अनेक जागतिक पातळीवरचे खेळाडु दीलेत.अॉलिंपिक्समध्ये पण या देशाचा सहभाग असतो.

      असा हा देश!असे इथले खेळ आणि खेळाडु!आणि त्याचं असलेलं खेळावरचं प्रेम!


  *सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments