*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 31*

     *पिकतं तिथंच विकतं*


इथे आल्यावर साहजिकच माझ्यासारख्या गृहिणीला पडलेला बेसिक प्रश्न.इथे भाज्या कोणत्या मिळतात?इथे भाजी मार्केट फक्त आठवड्यातुन एकदाच.एरवी ग्रोसरी शॉपमध्येच फळं,भाज्या सगळं मिळतं.भाज्यांच्या विभागात नजर टाकली असता कांदे,बटाटे,लसुण,टोमॅटो,फ्लॉवर,कोबी,ब्रोकोली,फरसबी ,रताळी ,सिमला मिरची दोन तीन रंगांची.गाजर,बीट,कांदापात,पालक , लाल भोपळा , मोठी भरताची वांगी अशा ओळखीच्या आणि काही अगदी माहीत नसलेल्या भाज्या दिसल्या.एक घेवड्यासारखी भाजी,झुकीनी,लाल रंगाचा कोबी,सॅलडची पाने अशी बरीच भाजी विकायला होती.

    फळे इथे मुबलक प्रमाणात तयार होतात.प्रामुख्याने सफरचंद,पिच,पेअर,मोसंबी,किवी,अॅव्हाकाडो,चेरी,बेरीज,रासबेरी ,स्ट्रॉबेरी ,कलिंगड ,हिरव्या रंगाची सफरचंद अशी अनेक प्रकारची फळे दिसतात.

 नेदरलँडस हा देश जगातील दुसरा फळे,भाज्या,डेअरी प्रॉडक्टस,फुले आणि मांसजन्य प्रकार निर्यात करणारा देश आहे.

   इथे बार्ली,गहु,मका,बटाटा ,मोहरी ही पीकं वर्षभर घेतात.

  इथला बटाटा खुप प्रमाणात पिकवतात.त्याचेच फ्रेंच फ्राईज,पोटॅटो चिप्स बनवतात.त्यासाठी विशिष्ट प्रकारचा बटाटा लागतो.चवीला तो खुप छान असतो.त्यामुळे कोणताही मसाला,मीठ ,तिखट न घातलेले फ्रेंच फ्राईज आणि चिप्स अतीशय टेस्टी असतात. 

इथे या पदार्थांचा भरपुर आस्वाद घेतला. दुध ऊत्पादनात पण  हा देश अग्रणी असल्याने ,दुग्धजन्य प्रकारही मोठ्या प्रमाणावर तयार होतात.

  सगळ्या प्रकारचे चीज ,बटर,दही , योगर्ट,आईस्क्रीम मोठ्या तयार  होते.

   नेदरलँडसला फुलांचाच देश म्हंटल्यास वावगं ठरु नये इतक्या विविध प्रकारची फुले येथे आढळतात.फुलांची शेती पण मोठ्या प्रमाणावर करतात.

   मोहरी येथे पिकवतात .त्याचा ऊपयोग मस्टर्ड सॉस तयार करण्यासाठी वापरतात.

फळांचे ज्युसेस इथे तयार नैसर्गीक पद्धतीनै करतात.ते पण दुकानात  खुप प्रकारचे  विकायला ठेवलेले दिसतात.

    एकुणच इथली जमीन सुपीक आहे.नद्या,कालवे ,वर्षभर पडणारा पाऊस ,सेंद्रीय पद्धतीने केलेली खते आणि शेतीला यांत्रिक पद्धतीने करण्याची दिलेली जोड यामुळे हा देश सुजलाम ,सुफलाम बनला आहे.


     चार महिने ओपन फिल्डसमध्ये आणि आठ महिने ग्रिनहाऊसमध्ये अशी सगळ्या शेतीची योजना केलेली असते.

    शैती बरोबरच मेंढीपालन,घोडेपाळणं  वराह पालन,कुक्कुट पालन असे पुरक व्यवसाय करतात.त्यामुळे चिकन,पोर्क,बीफ ,अंडी यांचेही ऊत्पादन तसेच निर्यातही करतात

    कॅनाल्स हे सगळ्या देशभर पसरलेले जाळे आहे त्यामुळे मासे पण मुबलक प्रमाणावर मिळतात.

इथल्या बदलत्या  हवामानाशी सामना करत ,तर कधी जुळवुन घेत इथला शेतकरी कष्ट करुन स्वत:साठी आणि देशासाठी राबतो आहे.देशाला अधिकाधिक ऊत्पन्न देऊन आर्थिक हातभार लावत आहे.म्हणुनच 'पिकतं तिथं विकतं 'असं म्हणण्यापेक्षा,पिकतं तेथुनच विकलं (निर्यात) जातं'.बरोबर ना!

    *सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments