*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 32*


परदेशात फिरतांना जात,धर्म,पंथ,राज्य,भाषा ,प्रांतवाद या सगळ्या शृंखला आपोआप गळुन पडतात.फक्त *Indian* म्हणजे भारतीय असल्याची जाणीव प्रकर्षाने होते.

अशाच काही व्यक्ति निरनिराळ्या ठीकाणी भेटल्या त्याबद्दल थोडंसं.

   गौडा नावाच्या चीजच्या गावात गेलो असतांना.इंडीयन रेस्टॉरंट शोधत  होतो.त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो असता.एक रुची नावांचीअगदी तरुण मुलगी ते रेस्टॉरंट चालवत असलेली दिसली.पुण्यात डी.वाय.पाटील महाविद्यालयात शिकलेली.मुळची दिल्लीची ही पंजाबी मुलगी  डेकोरेटीव्ह मेणबत्ती बनवण्याचा कारखाना चालवते.तसेच विक्री करते.पंजाबी पद्धतीचे जेवणही स्वत: हाताने करुन घालते.तीच्याशी गप्पा मारुन छान वाटलं.अतिशय कष्ट करुन एवढ्या लांब एकटीच ती आपला चरितार्थ चालवते आहे.खरोखरच कौतुकास्पद वाटलं.

    बेल्जियममध्ये स्वान लेकच्या शेजारीच काॅफीशॉप चालविणारा एक मध्यमवयीन मुळचा मुंबईचा.शिवडी येथे राहणारा हा तरुण बय्राच वर्षांपुर्वी घरचा बांगड्या बनविण्याचा व्यवसाय सोडुन इथे स्थिरावला आहे.अनेक घडामोडीनंतर त्याला इथेच बरं वाटतंय.मराठी,हिंदी छान बोलत होता.

 बेल्जियममध्येच एक टॅक्सिड्रायव्हर भेटला.मुळचा बांगलादेशी .भारतातही काही दिवस नोकरी केलेला.भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल भरभरुन बोलत होता.

अजुन एके ठिकाणी भेटलेला ग्रोसरी शॉपमध्ये काम करणारा नेपाळी .तो पण भारताबद्दल विशेष आस्था ठेऊन बोलत होता.आपल्या घरचंच कोणी भेटलं असं वाटतं त्यांना,

    रवीवारी रॉटरडॅमला गेलो होतो.तो टॅक्सी ड्रायव्हर मुळचा केनीयन.काही काळ भारतात हैद्राबाद येथे राहुन गेलेला.भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल स्वत:हुनच खुप बोलत होता.केनीयात पण खुप भारतीय आहेत.मोंबासामध्ये तर भारतात आल्यासारखंच वाटतं,असेही म्हणाला.भारतीय लोक खुप इंटेलिजंट (बुद्धीमान)आहेत .सगळ्याच देशांमध्ये मोठमोठ्या पदांवर तसेच राजकारणात देखील मंत्री म्हणुन काम करत आहेत ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे असे त्याने सांगीतले.एक भारताची लोकसंख्या सोडली तर भारत खरंच खुप छान देश आहे असं त्याचं म्हणणं.ब्रिटनचे पंतप्रधान पण भारतीयच असल्याचे  त्याने सांगीतले.शेवटी एकच जाताजाता त्याने सांगीतले की इकडे युरोपमध्ये खुप शिस्त,नियम आणि एक सिस्टीम आहे .ती खुप यशस्वीपणे राबवली आहे,म्हणुन इथलं आयुष्य सुखकर,सोयिस्कर वाटतं.जास्त क्राऊडेड पण नाही,निसर्ग छान आहे.त्यामुळे गेल्या दहा बारा वर्षांपासुन तो इथे स्थिरावलाय.इथेच रमलाय.

     जवळच्या शॉपींग मॉलमध्ये खरेदीला गेलो असता,एक मध्यमवयीन इंडीयन महीला  काऊंटरजवळ दिसली.ती पण स्वत:हुन बोलु लागली.कोठुन आलात वगैरे.ती पण दील्लीचीच नांव 'वर्षा' .यौगायोग असा की ती पण इथे आमच्या घराजवळच रहायला आहे.पण कधी भेटली नाही.ती पण भारत,तीचं कुटुंब,मुंबईतले नातेवाईक याबद्दल बोलत होती.

   तसे तर खुप भारतीय राहतात,दिसतात.कष्ट करुन ,इथल्या हवामानाशी  जुळवुन घेतात.तरीपण मनांत भारताबद्दल,प्रेम,आस्था,आठवणी,नात्यांची ओढ.भारताची प्रगती .भारताचे ऊंचावलेली नांव.निर्माण झालेली ऊज्वल प्रतिमा.कुठेतरी जाणवत रहाते.भारतापासुन हजारो किलोमिटर दुर असले तरीही त्यांच्या मनांतला एक कप्पा  कायम भारतासाठी असणार आहे.त्यांच्या ह्रदयांत 'भारत' सदैव वसलेला आहे.

    

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments