*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 8*

   

 Zannse Schans  Windmills  झांसेस कान्स पवनचक्क्या 

   जगप्रसिद्ध असे हे ठिकाण!ज्याची जपणुक जागतिक वारसा म्हणुन केली आहे. 

 सोळाव्या शतकातील या पवनचक्क्या आहेत!झान नदीच्या काठी ऊभारलेल्या! पुढे अठराव्या एकोणीसाव्या शतकात पुन्हा देखभाल ,दुरुस्ती करुन चालु स्थितीत ठेवल्या आहेत.यातील पवनचक्क्या आतुनही वर पर्यंत जाऊन बघता येतात.बाहेरुन दगडी बांधकाम!वर मोठमोठी लाकडी पाती फिरत असतात.काहींचा ऊपयोग धान्य दळण्यासाठी,तेल बीयांपासुन तेल काढण्यासाठी होत असे. 

हा संपूर्ण परिसर खुप मोठा आहे.यात शेवटच्या पवनचक्की पर्यंत चालत जाता येते.अगदी अपंग व्यक्तीनांही व्हिलचेअरवर जाण्यासाठी रस्ता आहे.

 या शिवाय चिज कसे बनते याचे प्रदर्शन तसेच फॅक्टरी आहे.पारंपारीक लाकडी बुटांचा कारखाना आहे.काही हाताने बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तुंचे प्रदर्शन आहे.कॉफीशॉप्सची सोय आहे.भलंमोठं पार्कींग आहे.

या परिसरात देखील कालच्या लेखात सांगीतल्याप्रमाणे घरे जपलेली आहेत.

  या पवनचक्क्या पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात!

 बाजुलाच मोठी नदी आहे तसेच  एका बाजुला मोकळी शेतजमीन आहे .तेथे शेळ्या ,मेंढ्या,गायी कोंबड्या मुक्त संचार करत असतात.

      मधे मधे छोटे पुल,पाणी,बदकं ,पाणपक्षी आहेत.विविधरंगी फुलेपाने,झाडे,झुडपे याने परिसर सुशोभित केला आहे.

       जगप्रसिद्ध अशा या पारंपारिक पवचक्क्यांचं पाहून भारावुन जायला होतं.ते रुप मनांत साठवत आणि फोटोत बंदीस्त करतच आपण परतीच्या प्रवासाला लागतो.

   *सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments