*अलिबाग ते अॅमस्टरडॅम*
आज जरा वेगळ्या विषय मांडणार आहे.
युरोपमध्ये फिरतांना एक ठळकपणे जाणवलं ते म्हणजे इथे सगळीकडे दिसणारी वृद्धांची संख्या.कुठेही मार्केटमध्ये,बसमध्ये,ट्रेनमध्ये,किराणा दुकानात,भाजीच्या दुकानात,कॅफेत सगळीकडेच वृद्ध मोठ्या प्रमाणात आढळतात.बहुतेक जण एक एकटे किंवा मित्रा सोबत,मैत्रिणी सोबत असे दिसतात.कधी सायकलवर,कारने अगदी काठी टेकत,दोन्ही हातात दोन काठ्या टेकत,वॉकर घेऊन ,व्हिलचेअरवर ,बॅटरी अॉपरेटेड छोट्या गाडीवर वृद्ध दिसुन येतात.बहुतांशी वृद्ध स्वत:ची कामे स्वत:च करतांना दिसतात.प्रवासही एकट्यानेच करतात.कोणावर अवलंबुन राहीलेली पाहीली नाहीत.आर्थिकबाजु पण बरीच चांगली असावी.कारण सगळ्याच वृद्धांचे राहणीमान ,पोषाख त्यांच्या जर्कीन्स,जॅकेटस,शुज बघीतले की लगेच लक्षात येतं.
इथलं निवृत्तीचं वय एकोणसत्तर आहे. त्यामुळे बस ड्रायव्हर,रेल्वे ड्रायव्हर ,विमानात विमान सेविका ,सगळीकडेच प्रौढ स्री,पुरुष काम करतांना आढळतात.
असं म्हणतात युरोप म्हातारा होत चाललाय एकुण लोकसंख्येपैकी 44.4 % इतकी लोकसंख्या चाळीशीच्या पुढची आहे.आणि 21 % लोकसंख्या पासष्टीच्या पुढची आहे.हे प्रमाण वाढत जाणार आहे.
वृद्धांची वाढती लोकसंख्या,जन्मदर कमी आणि चांगले अारोग्य यामुळे यात वाढ होतेय.इथलं सरकार मुलांना जन्म देण्यासाठी लोकांना आव्हान करतंय.त्यासाठी टॅक्समध्ये सवलतही दीली जातेय.काहीवेळा एकाच कुटुंबात दोन,तीन मुले अशी बघीतली.
वृद्धांमुळे एकुणच सरकारच्या तिजोरीवर त्यांच्या आरोग्यविम्याचा तसेच त्यांच्या देखभालीचा खर्चाचा मोठा ताण येतोय.या शिवाय नवीन कामे करायला माणसं ऊपलब्ध नाहीत.कामाची क्षमता कमी होतेय,ऊत्पादनक्षमता कमी होतेय.नवीन योजना चालु करायच्या असतील तर तरुण तडफदार मनुष्यबळ नाहीये.वृद्धांची निवृत्तीनंतर काही काम मिळावे.ऊत्पन्न चालु राहावे अश्या मागण्या सरकारकडे आहेत.
परवा तर अगदी वाकलेली वृद्ध स्री बसमध्ये चढली.सोबत ग्रोसरीसाठी लागणारी ट्रॉली बॅग पण होती.पुढे बसमधुन ऊतरुन रेल्वेस्टेशनवर गेली.अशा अतीवृद्ध व्यक्तिंना बघीतलं की दया येते.
Europe is greying Europe is Aging असा सध्या या सगळ्याचा ऊल्लेख होतोय.यावर ऊपाय योजना चालु आहेत.पण सगळी ऊतरंडच कोलमडली आहे.ती पुर्ववत व्हायला वेळ लागेल.
मला आपला भारत आठवला .'भारत हा तरुणांचा देश आहे'. असं का म्हणतात याचं लख्ख चित्र डोळ्यासमोर आलं.
*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम लेख 21
Comments
Post a Comment