*अलिबाग ते अॅमस्टरडॅम  लेख



*BRUGES*


 Bruges (ऊच्चार ब्रुज)  बेल्जियममधील एक सुंदर गांव.अँटवर्पमधील सेंट्रलस्टेशनवरुन रेल्वेने दोन तासात ब्रुजला जाता येते.

 ब्रुजला सिटी अॉफ कॅनाल्स म्हणतात.इथे पाय टाकताच आपण काळाच्या कित्येक शतकं मागे जातो.केवळ तीस किलोमिटर परिघ असलेले गाव चालत चालत आरामात फिरता येते.

आम्ही पण ब्रुजस्टेशनवर ऊतरलो.इथेही पाऊस सोबत होताच.ऊतरल्यावर गरम कॉफी घेतली आणि निघालो.

  ब्रुज —युनेस्कोने जतन केलेले मध्ययुगीन शहर.पंधराव्या शतकात जसे होते तसेच ते ठेवायचा आटोकाट प्रयत्न केलाय.

चालता चालता अनेक देखण्या इमारती दिसत होत्या.काही इमारती सरकारी अॉफीसेस म्हणुन वापरली जातात.

जुने राजवाडे,भव्य कॅथेड्रल्स,चर्चेस ,म्युझीयम्स ,अरुंद वळणावळणांचे रस्ते.इथले रस्ते दगडांनी बनलेले आहेत.पुर्वीपासुन बनलेले आहेत ते अाजतागायत तसेच आहेत.याच रस्त्यांवर घोडागाड्या पर्यटकांना फिरवत असतात.घोडागाडीही जुन्याकाळातली आठवण करुन देणारी!वैशिष्ट्यपूर्ण!घोड्यांच्या टापांचा  टपटप असा आवाज दगडी रस्त्यांवरुन घोडागाडी धावतांना सतत कानावर पडतो.

  ब्रुजला ऊत्तरेकडचं व्हेनीस असंही संबोधलं जातं.यातुन मोठ्या प्रमाणावर बोट राईडस चालु असतात.इतर बाकीची शहरे आधुनिकतेकडे जात असतांना ब्रुजने मात्र त्याचं  गॉथिक शैलीतील आर्किटेक्चर अबाधीत राखलंय.इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा येथे पदोपदी अाढळतात.युरोपच्या इतर शहरांपेक्षा हे शहर त्याचं मध्ययुगीन खुणा अंगावर लेऊन दिमाखात ऊभं आहे.

दर तासाला वाजणारी टीपीकल चर्चची बेल तर क्षणात पंधराव्या शतकात नेते.

   शहराच्या मध्यभागी एका मोठ्या पुतळ्याच्या सभोवती तर अनेक ऐतिहासिक इमारती एकवटल्या आहेत.

लेकमधुन संथगतीने या इमारती न्याहाळत हिंडता येते.अनेक चित्रपटांचं शुटींगही येथे झालेलं आहे.लेकच्या काठावर अनेक हॉटेल्स,रेस्टॉरंटस,कॉफीशॉप्स आहेत.

  इथलं अजुन एक प्रसिद्ध लेक म्हणजे स्वान लेक.पांढरेशुभ्र ,ऊंच निमुळती मान असलेले अडीच तीन फुटांचे हे पक्षी.यांची संख्या या लेकमध्ये खुप आहे.सोबतीला बदक आणि इतर पाणपक्षी पण असतात.हे स्वान बघायला पर्यटक येथे मोठी गर्दी करतात.लहान मुलांसाठी पण हे लेक आकर्षणाचा स्पॉट बनलेले आहे.

दुपारी भारतीय जेवण मिळणारे रेस्टॉरंट बघुन जेवण्याचा,विश्रांतीचा ठहराव घेतला.जेऊन पुन्हां ऊरलेले ब्रुज बघत चालत राहीलो.बरचसं ब्रुज बघुन झाल्यावर पुन्हां एकदा काॅफीब्रेक घेतला आणि स्टेशनच्या दिशेने पावलं वळवली.पाऊस पण आमच्याबरोबरच निघाला!

असं हे मध्ययुगीन ऐतिहासिक शहर.आपल्याला टाईम मशीनमध्ये बसवुन काळाच्या मागे नेते.एकदा तरी नक्की बघायला हवे.


*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments